कौटुंबिक न्यायालयातील खटले वाढत असल्याची दखल घेत नाशिकरोड येथे गुरुवारी ( दि.१८ ) कौटुंबिक न्यायालयाचे उदघाटन झाले. न्यायाधीश म्हणून सुरेखा पाटील रुजू झाल्या आहेत. न्यायालयासाठी बार कौन्सिलने पाठपुरावा केला होता.अतिरिक्त कौटुंबिक न्यायालयाला एक वर्षापूर्वी उच्च न्यायालयाने मंजूरी दिली होती.
कौटुंबिक न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश प्रसाद पालसिंगणकर, अतिरिक्त न्यायाधीश सुरेखा पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. नाशिक रोड कौटुंबिक न्यायालय बार कौन्सिलच्या अध्यक्षा ॲड. आशा देशमुख, उपाध्यक्ष ॲड. शिरीष पाटील, ॲड. चैताली कुटे यांनी न्या. पालसिंगणकर यांचे आभार मानले. नाशिक रोड बार असोसिएशनचे अध्यक्ष सुदाम गायकवाड, ॲड. नितीन पंडित, ॲड. भूषण बाजपेयी, ॲड. ऋषिकेश कातकडे, ॲड. योगेश शिरसाट, ॲड. जयंत शेलार, ॲड. पौर्णिमा जाधव, ॲड. अश्विनी कुलकर्णी, ॲड. विद्या जाधव, ॲड. चैताली सुर्वे, ॲड. बी. डी. मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कौटुंबिक न्यायालयात पाच हजारापेक्षा जास्त प्रकरणे प्रलंबित असल्यामुळे नाशिक रोड येथील कौटुंबिक बार असोसिएशनतर्फे अतिरिक्त न्यायाधीश व त्यांच्याआस्थापना मंजुरीसाठी प्रयत्न सुरू होते. त्यात कॅन्टोन्मेंट हद्द कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधिकार कक्षेत समाविष्ट केल्यामुळे कौटुंबिक न्यायालयात कौटुंबिक वादांची प्रकरणे वाढत होती. फॅमिली कोर्ट बार असोसिएशनच्या मागणीप्रमाणे २ जानेवारी २५ रोजी अतिरिक्त कौटुंबिक न्यायाधीश व त्यांच्या आस्थापनेला मंजुरी मिळाल्यानंतर फॅमिली कोर्ट बार असोसिएशनच्या प्रयत्नानंतर अतिरिक्त कौटुंबिक न्यायाधीश व त्यांच्या आस्थापनेसाठी निधी मंजूर झाला. सुरेखा पाटील यांची अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. स्वागत समारंभाला फॅमिली कोर्ट बार असोसिएशनचे पदाधिकारी शिरीष पाटील, प्रतापसिंह परदेशी, नीता पवार, पूनम तांबट, अनिकेत वाडेकर, सोनिया जाधव आदी उपस्थित होते.