नाशिकचे कांदा उत्पादक उत्पादक शेतकरी माझे आहेत, त्यांच्या कांद्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार योग्य भाव देत नाही, योग्य भाव मिळावा यासाठी ते लढा देताय, आंदोलने करीत आहे. संतप्त शेतकऱ्यांचे आंदोलने चिरडून टाकले जात आहे. मोदी यांच्या सभेपूर्वी आंदोलक शेतकऱ्यांवर पोलीस बळाचा वापर करतांना दिसतात, त्यांना स्थानबद्ध केले जात आहे. मात्र शेतकऱ्यांनो तुम्ही घाबरू नका, आता मी नाशिकला आलोय, कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढायला आलोय.असे प्रतिपादन उबाठा शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.
नाशिक लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारासाठी बुधवारी ( दि.१५ ) उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेचे आयोजन नाशिक येथे करण्यात आले होते. त्याप्रसंगी उद्धव ठाकरे बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी चौफेर टीका केली. शेतकऱ्यांच्या बियाण्यावर तसेच अवजारांवर जीएसटी लावण्यात येतो, ट्रॅक्टरच्या कर्जावर सर्वाधिक व्याजदर अन इतर वाहनांच्या कर्जावर कमी व्याजदर, असा भेदभाव केंद्र सरकार का करते, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित करून मोदी सरकार यांच्यावर ठाकरे शैलीत जोरदार टीका केली.
त्या व्हिडीओ ची चर्चा ऐकलीय : उद्धव ठाकरे“ठाकरे म्हणाले की, मी प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या एका व्हिडिओची चर्चा ऐकलेली आहे. त्याचप्रमाणे मी महाविकास आघाडीचे आपले उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्याही एका व्हिडिओची चर्चा ऐकलेली आहे. राजाभाऊ वाजे यांचा पाहिलेला व्हिडिओ मध्ये ते इंग्लिश अतिशय उत्तम प्रकारे बोलतात असा व्हिडीओ पाहिलेला आहे. असा उल्लेख होताच उपस्थितांनी जोरदार टाळ्यांचा कडकडाट करून ठाकरे यांना दाद दिली”.
राजाभाऊ दिल्लीत जाणार हे निश्चित : खासदार संजय राऊत
नाशिक लोकसभा मतदार संघातील जनसामान्याच्या प्रतिक्रिया माझ्या कानावर आलेल्या आहेत, तसेच येथील राजकीय वातावरणाचा अंदाज माझ्यापर्यंत पोहोचलेला आहे. महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे हे नक्की आणि शंभर टक्के खासदार होतील , संसदेत जाऊन ते नाशिकच्या प्रश्नांना वाचा फोडतील, यामध्ये तीळ मात्र शंका नाही, असे विधान खासदार संजय राऊत यांनी करताच उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात खासदार राऊत यांच्या विधानाला दाद दिली.