22.5 C
Nashik
Sunday, July 6, 2025
spot_img

शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सुधारित मशागत तंत्रज्ञानाचा वापर करावा ! ; मनसेचे उपाध्यक्ष खंडेराव मेढे यांचे कृषिमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांना निवेदन

424 Post Views

नाशिकरोड उमेश देशमुख 

महाराष्ट्रासह देशभरात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढलेले दिसते. शेतीमध्ये भांडवल अधिक आणि उत्पन्न कमी अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. सुधारित मशागत तंत्रज्ञानाचा वापर केल्यास शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होईल. परिणामी आत्महत्येचे प्रमाण कमी होऊ शकते अश्या मागणीचे निवेदन केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष खंडेराव मेढे यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले.

नांदूर मानूर परिसरात शासकीय मान्यता प्राप्त विश्वास पात्र महारुद्र नर्सरी 

निवेदनातील असे असा, कापूस आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांना किमतीतील सततचा चढउतार आणि शेतमालाच्या बाजारभावातील तफावत यामुळे आर्थिक नुकसान सोसावे लागते आहे. त्यामुळे भाजीपाला आणि नाशवंत वस्तूंना किमान आधारभूत किंमत द्यावी, दर्जेदार आणि प्रमाणात शेतमालाचे उत्पादन करणारे शेतकरी मात्र विक्रीत अपयशी ठरतात. त्याच वेळी शेतकरी विविध आव्हानांना तोंड देत आहेत. मजुरांची अनुपलब्धता, वाढीव खर्च, हवामानातील अचानक बदल आणि त्याचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांना योग्य सल्ला आणि प्रगत कृषी तंत्र मिळत नाही. कृषी पदवीधरांना तंत्रज्ञान बॅकस्टॉपिंगसह पाठबळ देऊन आणि मागास आणि अग्रेषित संबंध निर्माण करून आपण शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या थांबवू शकतो. असा उपाय मनसेने निवेदनात सुचविलेला आहे.

महाराष्ट्रात कृषी क्षेत्रातील गुंतवणूक कमी होत असून शेतकरी आत्महत्यांकडे झोपताना दिसतात. कृषी विद्यापीठांमार्फत अश्या घटना थांबविल्या जाऊ शकतात. त्यावर सुधारित तंत्रज्ञान हा उत्तम पर्याय दिसतो. शेतकऱ्यांच्या मागणीवर आधारित तंत्रज्ञानाची सुविधा उपलब्ध नसल्याने कृषी विद्यापीठांचीही अवस्था बिकट झाल्याचे निवेदनात म्हटले आहे. याप्रसंगी रमेश खांडबहाले, बाजीराव मते, पुनमचंद करडेल,नितीन हगांगरे आदी उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles