22.5 C
Nashik
Saturday, July 5, 2025
spot_img

नाशिक मराठी पत्रकार संघातर्फे कार्यगौरव पुरस्कार-२०२५ जाहीर  ;६ जानेवारी रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार वितरण

720 Post Views

नाशिकरोड : उमेश देशमुख.

जिल्हाभरात मराठी पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या नाशिक मराठी पत्रकार संघाचे कार्यगौरव पुरस्कार – २०२५ जाहीर करण्यात आले असून यात प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया कला, क्रीडा, कृषी, धार्मिक, शैक्षणिक, वृत्तपत्र विक्रेते, उद्योजक, सामाजिक संस्था आदींसह ४० जणांचा कार्यगौरव पुरस्काराने सन्मान केला जाणार असल्याचे तालुका अध्यक्ष सुनील पवार यांनी सांगितले.

नांदूर मानूर परिसरात शासकीय मान्यता प्राप्त महारुद्र नर्सरी

जेलरोड येथील राजराजेश्वरी मंगल कार्यालय येथे सोमवार दि. ६ जानेवारी रोजी सकाळी ११ वा.आमदार अँड. राहुल ढिकले यांच्या अध्यक्षतेखाली या पुरस्काराचे वितरण होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सरोज आहिरे, कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या नामनिर्देशित सदस्या प्रीतम आढाव, शंकर एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी रतन चावला, व्यापारी बँकेचे संचालक गणेश खर्जुल, एकलहरे येथील माजी सरपंच सागर जाधव आदींसह विविध मान्यवरांच्या उपस्थिती राहील. याप्रसंगी उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थापक अध्यक्ष मोतीराम पिंगळे, ज्येष्ठ पत्रकार नरेंद्र पाटील,माजी अध्यक्ष सुधाकर गोडसे, अध्यक्ष सुनील पवार, कार्याध्यक्ष अरुण बिडवे, सरचिटणीस अरुण तुपे यांसह पदाधिकारी व सदस्य यांनी केले आहे.

यांना जाहीर झाले पुरस्कार

नाशिक तालुका पत्रकार संघाची अध्यक्ष सुनील पवार यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली. यावेळी पुरस्कार्थीची निवड जाहीर करण्यात आली. यामध्ये प्रिंट मीडियासाठी फणींद्र मंडलिक (महाराष्ट्र टाइम्स ),नरेंद्र जोशी (देशदूत), दिलीप सोनार (गावकरी), तुषार माघाडे (सकाळ), नरेंद्र दंडगव्हाळ (लोकमत ), विजय गीते (पुण्यनगरी), प्रदीप गायकवाड (दिव्यमराठी ), नाना खैरनार (भ्रमर ), स्वप्निल लेकुरवाळे ( आपलं महानगर), दिलीप सूर्यवंशी (पुढारी), कुंदन राजपूत (लोकनामा), सुधीर पेठकर (नवराष्ट्र), संजय देवधर (न्यूज मसाला ), संदीप नवसे (जागर जनस्थान ), साहिल बेलसरे (9 न्यूज महाराष्ट्र) , प्रशांत जेजुरकर (दिशा न्यूज),तेजस्विनी ताकाटे (एनसीएन न्युज) यांसह वृत्तपत्र विक्रेते भाग्यश्री माळवे ( नाशिकरोड ), प्रकाश गोडसे (देवळाली कॅम्प ) ज्ञानेश्वर वाघ ( जेलरोड ), मीना वाकचौरे ( गिरणारे ) आदींसह विशेष पुरस्कार्थींमध्ये सरस्वती मित्र मंडळ (देवळाली कॅम्प), वैभव ग्रामीण पतसंस्था (पळसे), आदिशक्ती मित्र मंडळ (माडसांगवी ), जाखोरी क्रांती वाचनालय (जाखोरी), रॉयल रायडर्स (सायकल समूह ), हरिनाम सप्ताह कमिटी (शिंदे ), गजानन महाराज महिला भजनी मंडळ ( भगूर ), स्व गणेश धात्रक शिक्षण संस्था (जेलरोड), हॉलिफ्लॉवर इंग्लिश मीडियम (नाशिकरोड), शुभम शिंदे (पळसे ), प्रवीणशेठ लकारिया (भगूर), भक्ती कोठावळे (नाशिक), संगीता पिंगळे (मातोरी), शिवाजी माळोदे (नांदूर), दिनेश निकम (जेलरोड), कैलास धात्रक (जाखोरी), करण हेमंत गायकवाड (नाशिकरोड), पंकज शेलार (विजयनगर), राजेंद्र खर्जूल ( कृषी )आदींचा सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव केला जाणार आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles