मुंबई येथे वास्तव्यास असणाऱ्या एका पंचेचाळीस वर्षांच्या महिलेची नाशिक शहरातील मालमत्ता खोटे दस्तऐवज तयार करून ते खरे असल्याचे भासवत पाच कोटी रुपयांची मागणी करणाऱ्या अकरा जणांवर इंदिरा नगर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात एका राजकीय पक्षातील कार्यकर्त्यांचा देखील सामावेश आहे. पिडीत महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे.
श्रीमती लिना प्रकाष लुल्ला ( वय ४५ ) राहणार वर्शे, विठठ्ल नगर सोसायटी,जे.व्ही. पी.डी. स्कीम, जुहु, मुंबई असे तक्रारदार महिलेचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, संशयित आरोपींनी आपसांत संगनमत केले. कटकारस्थान रचले. माझ्या दुर्बलबतेचा फायदा उचलुन व आमची मौल्यवान मिळकत हडपण्याकरिता खोटे कागदपत्र तयार केले. ते खरे आहे असे भासविण्याचा प्रयत्न केला. आमची फसवणुक करून आमच्या मिळकतीत गुंड आणले. आम्हास शिवीगाळ ,धक्का बुक्की केली. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. आमच्याकडे मिळकती ऐवजी पाच कोटी रुपयांची खंडणीची मागणी केली. आमच्या मिळकतीची नासधूस व नुकसान केले. शिक्षापात्र स्वरुपाचे गंभीर गुन्हयाचे कृत्य केले. त्यामुळे इंदिरा नगर पोलिसांनी संशयितांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.
यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल
गुन्हा रजिस्टर नोंद 440/2024 भा न्या संक 61 (2), 308 (2), 318 (4), 324 (4), 336 (3), 338, 340 (2), 329 (3), 352, 351 (2) (3) प्रमाणे गुल उर्फ राजु लखमीचंद लुल्ला, हेमंत पद्मकरजी दत्ता, किरण वाळके, शकील अहमद नजीर अहमद, पवन पवार,विषाल पवार,प्रविण किलाल बेंझ, सुभांशु बाबुराव जाधव,पवन दाखाने, सचिन भास्कर बच्छाव, सतीश माणिक भालेराव यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सन 2022 ते दि.16/12/2024 दरम्यान हॉटेल साई पॅलेस च्या बेजारी, राणेनगर, नाशिक, येथील सर्व्हे नं. 903/3ब/2 यांसी क्षेत्र 21122 चौरस मिटर या मिळकतीवरून हा प्रकार घडला.