2,252 Post Views
नाशिकरोड : उमेश देशमुख
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची जाहीर सभा मंगळवारी ( दि.१२ ) आडगाव येथील व्यायाम शाळेच्या मैदानावर आयोजित करण्यात आली होती. नाशिक पूर्व विधानसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश गीते यांच्या प्रचारासाठी आयोजन केले होते. सभेत स्थानिक नागरिकांपेक्षा आडगावच्या बाहेरील उमेदवारांच्या समर्थकांची अधिक गर्दी असल्याची चर्चा यावेळी सुरू होती.अर्थात शरद पवार जेष्ठ नेते असल्याने त्यांना पाहण्यासाठी व त्यांचे विचार ऐकण्यासाठी काही स्थानिक नागरिक उपस्थित होते.असा एक मतप्रवाह देखील चर्चेत होता.
नाशिक पूर्व विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार गणेश गीते यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांच्या सभेचे आयोजन आडगाव येथे करण्यात आले होते. विशेष म्हणजे शरद पवार यांच्या सभेच्या दोन दिवस अगोदरच आडगाव येथील नागरिकांनी विद्यमान आमदार राहुल ढिकले यांच्या पाठीमागे उभे राहून त्यांना विजयी करण्याचा ठराव मंजूर केला होता. त्यामुळे नाशिक पूर्व मतदार संघात आडगाव चर्चेत आले आहे. परिणामी आडगाव येथील शरद पवार यांच्या सभेकडे मतदार संघातील राजकीय जाणकारांचे लक्ष लागून होते. दरम्यान आडगाव मधील माजी नगरसेवक जे. टी. शिंदे, अतुल मते आणि मल्हारी मते यांच्यासह काही नेते मंडळींचा अपवाद वगळला तर इतर कोणतेही राजकीय पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित नसल्याचे दिसून आले. त्याचप्रमाणे महाविकास आघाडीचे शहरातील देवळाली विधानसभा मतदार संघाचे उमेदवार योगेश घोलप, मध्य नाशिकचे उमेदवार वसंत गीते, नाशिक पश्चिमचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांच्यासह महाविकास आघाडीचे मुख्य नेते पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
नांदूर मानूर परिसरात विवाह समारंभासाठी एकमेव सुसज्ज संजीवनी ए.सी.बँक्वेट मंगल कार्यालय