23.3 C
Nashik
Saturday, July 5, 2025
spot_img

शरद पवार यांच्या सभेकडे आडगावच्या बहुसंख्य स्थानिक नागरिकांनी कानाडोळा केल्याची चर्चा!; सभेला उमेदवारांच्या बाहेरील समर्थकांचीच गर्दी

2,253 Post Views

नाशिकरोड : उमेश देशमुख

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची जाहीर सभा मंगळवारी ( दि.१२ ) आडगाव येथील व्यायाम शाळेच्या मैदानावर आयोजित करण्यात आली होती. नाशिक पूर्व विधानसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश गीते यांच्या प्रचारासाठी आयोजन केले होते. सभेत स्थानिक नागरिकांपेक्षा आडगावच्या बाहेरील उमेदवारांच्या समर्थकांची अधिक गर्दी असल्याची चर्चा यावेळी सुरू होती.अर्थात शरद पवार जेष्ठ नेते असल्याने त्यांना पाहण्यासाठी व त्यांचे विचार ऐकण्यासाठी काही स्थानिक नागरिक उपस्थित होते.असा एक मतप्रवाह देखील चर्चेत होता.

नाशिक पूर्व विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार गणेश गीते यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांच्या सभेचे आयोजन आडगाव येथे करण्यात आले होते. विशेष म्हणजे शरद पवार यांच्या सभेच्या दोन दिवस अगोदरच आडगाव येथील नागरिकांनी विद्यमान आमदार राहुल ढिकले यांच्या पाठीमागे उभे राहून त्यांना विजयी करण्याचा ठराव मंजूर केला होता. त्यामुळे नाशिक पूर्व मतदार संघात आडगाव चर्चेत आले आहे. परिणामी आडगाव येथील शरद पवार यांच्या सभेकडे मतदार संघातील राजकीय जाणकारांचे लक्ष लागून होते. दरम्यान आडगाव मधील माजी नगरसेवक जे. टी. शिंदे, अतुल मते आणि मल्हारी मते यांच्यासह काही नेते मंडळींचा अपवाद वगळला तर इतर कोणतेही राजकीय पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित नसल्याचे दिसून आले. त्याचप्रमाणे महाविकास आघाडीचे शहरातील देवळाली विधानसभा मतदार संघाचे उमेदवार योगेश घोलप, मध्य नाशिकचे उमेदवार वसंत गीते, नाशिक पश्चिमचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांच्यासह महाविकास आघाडीचे मुख्य नेते पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

नांदूर मानूर परिसरात विवाह समारंभासाठी एकमेव सुसज्ज संजीवनी ए.सी.बँक्वेट मंगल कार्यालय

पाच वर्षात विकास नव्हे गुंड : गीते

नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात कोणत्याही प्रकारचा विकास झाला नाही, त्याऐवजी केवळ गुंड प्रवृत्तीला चालना मिळाली. आज मतदारसंघात गुंडांची संख्या अधिक आहे. अशी तक्रार शरद पवार यांच्या समोर उमेदवार गणेश गीते यांनी केली.

नांदूर मानूर ला आईला प्रचारापासून रोखले : गीते

माझी आई नांदूर मानुर परिसरात प्रचारासाठी गेली होती. सोबत एक ह.भ. प. महाराज होते. प्रचार करीत असताना त्यांना नांदूर मानूर परिसरातील काही नागरिकांनी रोखून येथे प्रचार करायचा नाही, अशी धमकी दिली. ही बाब अत्यंत खेदजनक असल्याचे गीते भाषणात सांगितले.

लोकसभेप्रमाणे विधानसभेत रोखा: शरद पवार

राज्यात कष्टकरी जनता, कामगार, तरुण, महिलांचे अनेक प्रश्न आहे. सर्वांनी एकत्रित येऊन महिलांसाठी योजना सुरू कराव्यात, शेतकरी संकटात सापडला आहे.शेतीमालाला भाव मिळत नाही.त्यामुळे आत्महत्या करण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. याविषयी लक्ष देणे गरजेचे आहे. केंद्रात ज्याप्रमाणे मोदी सरकारला ४०० पर्यंत पोहचू दिले नाही. त्याप्रमाणे विधानसभेत देखील विद्यमान महायुतीच्या सरकारला सत्तेपासून रोखावे,असे आवाहन शरद पवार यांनी केले. त्याचप्रमाणे शहरात आयटी पार्कची आवश्यकता असून राज्यात सत्ता मिळाली तर नाशिकला भव्य असे आयटी पार्क उभे करू असे आश्वासन यावेळी शरद पवार यांनी दिले.

गोडसे अन् मते यांचा उल्लेख

नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये जगदीश गोडसे आणि अतुल मते इच्छुक होते.परंतु एका वेळेस एकालाच संधी देता येते. भविष्यात दोघांचाही पक्षात योग्य सन्मान केला जाईल. त्यांच्यावर योग्य ती जबाबदारी दिली जाईल,असे आश्वासन शरद पवार यांनी दिले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles