531 Post Views
नाशिकरोड : उमेश देशमुख
नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार अँड राहुल ढिकले यांना मोठ्या मताधिक्याने पुन्हा एकदा निवडून आणण्याचा निर्धार शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात व्यक्त करण्यात आला. गुरुवारी ( दि.७ ) पंचवटी येथे दुपारी मेळावा पार पडला. मेळाव्यात नाशिक पूर्वसह शहरातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महायुतीचे उमेदवार अँड राहुल ढिकले यांच्या प्रचाराच्या निमित्ताने पंचवटी येथे नाशिक पूर्व विधानसभा शिवसेना प्रमुख पदाधिकारी, विभाग प्रमुख, शाखाप्रमुख, बुथ प्रमुख, यांचा मेळावा पार पडला. व्यासपीठावर आमदार राहुल ढिकले यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलेल्या मनोगतामध्ये आमदार ढिकले यांना पुन्हा निवडून आणण्याचा एकमुखी निर्धार व्यक्त करण्यात आला. मेळाव्यास शिवसेना उपनेते अजय बोरस्ते, उपनेते विजय करंजकर, संपर्क नेते जयंत साठे, सह संपर्क प्रमुख राजू लवटे, पूर्व विधानसभा प्रमुख तथा महायुती समन्वयक बाबुराव ( विनायक) आढाव , महानगरप्रमुख बंटी तिदमे , माजी स्थायी समिती सभापती आर.डी धोंगडे, सहसंपर्कप्रमुख गणेश कदम, उपजिल्हाप्रमुख दिगंबर मोगरे, माजी विधानसभा प्रमुख नितीन चिडे, शिवाजी भोर, सचिन मोगल, महिला आघाडी प्रमुख सुवर्णा मटाले, मंगला भास्कर , अस्मिता देशमाने , शामला दीक्षित , अमोल सूर्यवंशी . यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर बैठक पार पडली.
नांदूर – मानूर परिसरात विवाह समारंभासाठी एकमेव सुसज्ज संजीवनी ए.सी. बँक्वेट मंगल कार्यालय