568 Post Views
नाशिकरोड: उमेश देशमुख
नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार अँड राहुल ढिकले यांच्या समर्थकांनी गुरुवारी ( दि.७ ) आडगाव मळे वसाहतीवर तसेच थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पत्रके वाटत प्रचार केला. यादरम्यान शेतकऱ्यांचा मोठा पाठिंबा आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. येथील नव्वद टक्के जनता आमदार ढिकले यांच्या बाजूने आहे. असा दावा व्यक्त केला जातो आहे.
नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात आमदार अँड राहुल ढिकले दुसऱ्यांदा निवडणूक रिंगणात उतरले. महायुती मधील महत्त्वाचा घटक पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीची त्यांना उमेदवारी मिळाली. उमेदवारी जाहीर होण्याच्या अगोदर पासून ढिकले यांनी मतदारसंघात ठिकठिकाणी प्रचार सुरू केला होता. आडगाव येथे किमान दोन ते तीन वेळा प्रचार झालेला आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ढिकले यांचे समर्थक जोमाने प्रचाराला लागलेले दिसतात. यात गणेश माळोदे,अँड कैलास शिंदे ,सुरेश देशमुख ,संतोष भोर ,निवृत्ती शिंदे, शंकरराव नवले, तपकिरे अण्णा, सखाराम लभडे,प्रभाकर मते,विठ्ठल राजे माळोदे,संजय शिंदे,आदिनाथ दिवटे,राजू माळोदे,एकनाथ तपकीरे आदींचा समावेश आहे.
नांदूर – मानूर परिसरात विवाह समारंभासाठी एकमेव सुसज्ज संजीवनी ए.सी. बँक्वेट मंगल कार्यालय