239 Post Views
नाशिकरोड : उमेश देशमुख
ओम गुरु माऊली भक्त मंडळ, नांदूर, श्री निलकंठेश्वर महादेव मंदिर, नांदूरगाव, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने श्री राष्ट्र जनार्दन स्वामी (मौनगिरी) महाराज यांच्या परंपरेनुसार ब्रम्हलिन प.पु. मधूगिरी महाराज व प.पु. माधवगिरी महाराज यांच्या शुभप्रेरणे प्रदोष पंगत व तुलसी विवाह बुधवार ( दि १३ ) रोजी गोदावरी तीरावरील नांदूर येथील श्री निलकंठेश्वर महादेव येथे आयोजित केले आहे.
यादरम्यान अभिषेक पुजा : दु ३ ते ५ हरीपाठ ५ ते ६ नित्यनियम विधी ६ ते ७ दैनिक आरती : ७ ते ७.३० नंतर ८ नंतर प.पु. योगी माधवगिरीजी महाराज यांचे संगितमय प्रवचन व महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडणार आहे.भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भरत नामदेव निमसे व बाबाजी भक्त परिवारातर्फे करण्यात आले आहे.