गुणवत्ता नसलेल्या वातावरणात राज्यातील शिक्षक ज्ञानदानाचे काम करीत आहे. विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता निर्माण व्हावी, यासाठी ते झटताना दिसतात. सध्या गुणवत्ता निर्माण होईल असे वातावरण राज्यात आहे का ?, असा सवाल माजी आमदार तथा महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे राज्यअध्यक्ष ज. मो. अभ्यंकर यांनी उपस्थित केला आहे.
नाशिक येथे रविवारी ( दि.६ ) रोजी परशुराम सायखेडकर नाट्यगृहांमध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना नाशिक विभाग आयोजित शिक्षण तपस्वी पुरस्काराचे वितरण झाले. त्यावेळेस माजी आमदार अभ्यंकर बोलत होते.याप्रसंगी शिक्षक सेनेचे नाशिक विभागीय अध्यक्ष संजय चव्हाण, शिवसेना जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, राज्याचे माजी शिक्षण संचालक भालचंद्र देसले, पेरेंट्स असोसिएशनचे निलेश साळुंखे, भारतीय कामगार सेनेचे नितीन विखार आदी मान्यवर व्यासपीठावर होते. अंभ्यांकर यांनी यावेळी जुनी पेन्शन योजना, नव्याने जाहीर करण्यात आलेली युजीसी पेन्शन योजना, डीसीपीएस आणि एनपीएस या पेन्शन योजनेतील तफावत याविषयी माहिती दिली. त्याचप्रमाणे शिक्षकांना भेडसावणाऱ्या समस्या, राज्यातील शैक्षणिक बजेट आणि त्यावरील खर्चातील तफावत याची वस्तुनिष्ठ सखोल माहिती दिली. विद्यमान सरकारच्या कार्यपद्धतीवर आणि शैक्षणिक धोरणा संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले.
तर अभ्यंकर शिक्षणमंत्री –
राज्यातील शैक्षणिक क्षेत्रात माजी आमदार ज.मो.अभ्यंकर यांनी मोलाचे योगदान दिले. येत्या विधानसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीचे सरकार निश्चितपणे येईल. अभ्यंकर यांना शिक्षणमंत्री पद मिळेल. त्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असे गौरोदगार शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नाशिक जिल्हाध्यक्ष सुधाकर बडगुजर यांनी काढले. टाळ्यांच्या गडगडात उपस्थितांनी स्वागत केले.
यांना मिळाला पुरस्कार –
विविध गटात पुढील प्रमाणे पुरस्कार प्रदान करण्यात आले ते असे. उमेश देशमुख-पत्रकारिता,भाटिया कॉलेज देवळाली कॅम्प,अर्जुन कोकाटे – आदर्श संस्था, मायबोली निवास कर्णबधिर विदया येवला नाशिक, सुधाकर शंकर साळी- जीवनगौरव, अध्यक्ष, महाराष्ट्र समाज सेवा संघ नाशिक, रावसाहेब जाधव- क्रीडा जीवनगौरव, सेवानिवृत्त क्रीडा शिक्षक, गजानन खराटे- उच्च शिक्षण, प्राचार्य मातोश्री इंजिनिअरिंग कॉलेज एकलहरा, श्रीमती चैताली विश्वास- मुख्यध्यापक, के.एन.केला हायस्कूल, नशिक, तुकाराम धांडे- पाठ्यपुस्तकातील कवी, मु पो बारी तालुका अकोला जिल्हा अहमदनगर, प्रवीण पानपाटील- शैक्षणिक साहित्य निर्मिती, के आर टी हायस्कूल वनी दिंडोरी, श्रीनिवास मुरकुटे – स्काऊट, भारत स्काऊट गाईड संच नाशिक, अमोल अहिरे – अध्यात्म, माध्यमिक विदयालय जळगाव चोंढी तालुका मालेगाव, मगर विष्णु नामदेव – विविध उपक्रम, डॉ एन जे पाऊलदुवे विद्यालय अहमदनगर, संजय जेजूकर- विविध उपक्रम,साईबाबा कन्या विद्यालय शिर्डी अहमदनगर, ऐश्वर्या पाटेकर- काव्य, के के वाघ शिक्षण संस्था, हेमंत अशोक महाजन- नाट्य अभिनय, म.न.पा. मानूर, प्रा. डॉ.कृष्णा शंकर शहाणे – विद्यापीठीय लेखन साहित्य, बिटको सीनियर कॉलेज, नाशिक रोड, राजेंद्र केवळबाई प्र. दिघे- साहित्यिक, प्रा विभाग मालेगाव जिल्हा नाशिक, अशा निवृत्ती बडे- विविध उपक्रम, जि प लोणवाडी निफाड, देवेद्र नटवरलाल पंड्या- ग्रंथपाल, श्रीराम विद्यालय पंचवटी नाशिक, वैशाली भामरे- विविध उपक्रम, मनपा नाशिक, प्रवीण व्यवहारे- क्रीडा, छत्रे हायस्कूल मनमाड, विशाल दिलीप पाटील- तत्रज्ञान, जि प शाळा तालुका जिल्हा अजयपुर नंदुरबार, सौ. मिलन वसंतराव पाटील- आश्रम शाळा विभाग, माध्यमिक आश्रम शाळा वर्जी ता. शिंदखेडा जिल्हा धुळे, मिलिंद विठ्ठल पाटील- कला, माध्यमिक विद्यालय शिडी ता. शहादा जि. नंदुरबार , गणपतराव बेजेकर- शिक्षकेतर, व्ही.जे. हायस्कूल नांदगाव , आदींना पुरस्काराचे वितरण करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभागीय अध्यक्ष संजय चव्हाण यांनी केले. शिक्षक सेना २००६ पासून सातत्याने शिक्षण पुरस्कार चांगल्या शिक्षकांना प्रस्ताव न मागवता देत असते. असे स्पष्ट केले. सूत्रसंचालन आकाशवाणीचे निवेदक ऋषिकेश जाधव यांनी केले. तर आभार मधुकर वाघ यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुरेश घरटे, कलीम अन्सारी, राम धोंडगे, अनिल ढोकणे,हेमंत मोजाड,योगेश्वर मोजाड,राजेंद्र सावंत यांच्यासह शिक्षक सेनेचे पदाधिकारी व सदस्य प्रयत्नशील होते.