आमदार फरांदे यांनी सुप्रिया सुळे व अंधारे यांना प्रश्न विचारण्या अगोदर एम. डी. प्रकरणातील बडी भाभी कोण याचे उत्तर द्यावे ; राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नाशिक शहर जिल्हाध्यक्ष नितीन निगळ यांचे आवाहन
नाशिक : प्रतिनिधी बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर आमदार देवयानी फरांदे यांनी पत्रकार परिषदेत महाविकास आघाडी सत्तेत असतांना राज्यात महिलांवर अत्याचार झाले नाहीत का?, असा सवाल खासदार सुप्रिया सुळे आणि सुषमा अंधारे यांना उपस्थित करून बदलापूर घटनेवर राजकारण करू नये, असे आवाहन केले . पण आमदार फरांदे यांनी अगोदर एम. डी. ड्रग प्रकरणात नाव पुढे आलेली बडी भाभी कोण याचे उत्तर द्यावे, असे प्रति आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नाशिक शहर जिल्हाध्यक्ष नितीन निगळ यांनी फरांदे यांना दिले.
याविषयी निगळ यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले की, बदलापूर येथे दोन छोट्या चिमुरड्या मुलींवर झालेल्या बलात्काराचे खरंच भांडवल केल्या जातंय का? तर अजिबात नाही काही दिवसांपूर्वी डॉक्टर मुलीवर झालेल्या अत्याचारासाठी महाराष्ट्राचे सरकार आवाज उठवू शकतं , न्यायासाठी आंदोलन करू शकतं मग महाराष्ट्रात सर्व अधिकार त्यांच्या हातात असताना इथल्या गुन्हेगाराला शिक्षा का देऊ शकत नाही.
जत्रा हॉटेल शिवारात स्वप्नातील घरांसाठी विश्वासपात्र एकमेव समृद्धी बिल्डकॉम
त्यावर का कुणीच का बोलत नाही. भाजप पक्षाच्या महिलांसाठी आवाज उठवणाऱ्या आमच्या चित्रा ताई वाघ का काहीच बोलल्या नाही, नाशिकच्या देवयानी फरांदे मॅडमनी काँग्रेस सरकार मध्ये झालेल्या महिला अत्याचाराची यादीच वाचून दाखवली की, मेहबूब शेख, दिशा शालियान या प्रकरणी व महाविकास आघाडी च्या काळातील अत्याचारावर सुप्रिया ताई किंवा सुषमताई का बोलल्या नाही म्हणजे त्या तेव्हा बोलल्या नाही म्हणून तुम्ही आता यावर बोलायचं नाही असं ठरवलेले आहे का ? महिलांच्या बाबतीत राजकारणा पलिकडे विचार करा. मॅडम इतकंही असंवेदनशिल होऊ नका, घटनेची तक्रार नोंदवून घेण्यास उशीर का केला ते आधी स्पष्ट करा.आपल्या चुका स्वीकारायला शिका आणि त्यात सुधारणा करायला हव्यात.. गुन्हेगाराला कोण आणि किती पाठीशी घालतं हे सर्वसामान्य जनतेला ठाऊक आहे, तुमचे महायुतीच्या सरकारला जनतेच्या हिताचे आणि संरक्षणाचे काहीच पडलेले नाही , तुमचे सर्व लक्ष हे फोडाफोडीचे राजकारण करण्याकडे असतं आणि त्याला तुम्ही चाणक्य नीती असे संबोधतात आणि सामान्य जनता मात्र कपटी ,कारस्थानी असे म्हणते.कुठल्याही थराला जाऊन सत्तेची खुर्ची स्वतःकडे ओढून घेणाऱ्यांना पीडितांच्या भावना कधी कळतील , आश्वासनांच्या पुलावर उभे राहून लढाई जिंकता येत नाही इतके लक्षात ठेवा… बहीण माझी लाडकी पेक्षा बहीण माझी सुरक्षित ही योजना आणा. बहिणीच्या अब्रूची किंमत ही पैशात तोलता येणार नाही. त्यासाठी तुम्हाला गुन्हेगारांवर कठोर आणि लवकर कारवाई करावी लागेल. नाशिक जिल्ह्यात वाढलेल्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी तुम्ही कोणते पाऊल उचलणार काय उपाययोजना राबवणार त्यावर फरांदे ताईंनी बोलावे. उगाच कोणते सरकार कसे होते यावर बोलण्यापेक्षा तुम्ही काय करणार हे सांगावे, विषयांतर करून जबाबदारी झटकू नये. असे पत्रकाच्या शेवटी निगळ यांनी म्हटले आहे.
नाकर्ते पणा झाकू नये नाशिक शहरांत वाढलेली गुन्हेगारी,आपल्या कार्यकाळात नाशिक शहरात एम. डी. चा सुरु असलेला कारखाना आजही त्यातली बडी भाभी कोण? हे देखील नाशिककराना समजले नाही. त्यासाठी आपण काय पाठपुरावा केला, या वरती देखील आपण एक पत्रकार परिषद घ्यावी उगाच आपला नाकर्तेपणा झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न करून नये. नितीन बाळा निगळ शहर जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष नाशिक शहर जिल्हा