दिंडोरी : अशोक निकम साखर उद्योग विविध अडचणींना सामोरे जात असताना कामगारांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत कमी दिवसात जास्तीचे गाळप होणेसाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन कादवा चे चेअरमन श्रीराम शेटे यांनी केले.
कादवा सहकारी सारखर कारखान्याचे 48 व्या गळीत हंगामासाठी यंत्र जोडणी, मिल रोलर पुजन संचालक मधुकर गटकळ यांचे शुभहस्ते व चेअरमन श्रीराम शेटे यांचे अध्यक्षतेखाली पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. शेतकऱ्यांसाठी ऊस हे एकमेव शाश्वत पीक आहे त्यासाठी उसाची एफआरपी वाढणे आवश्यक असून त्यासाठी उसाची एफआरपी च्या तुलनेत साखरेचे किमान विक्री दर (एम एस पी) वाढणे गरजेचे आहे मात्र त्यात वाढ होत नाही त्यामुळे सर्वच कारखान्यांने आर्थिक संकटात असून एफआरपी देण्यात अडचणी येत आहे.त्यातच इथेनॉल निर्मिती बंधन स्पिरीट चे घसरलेले दर यामुळे कारखाने अडचणीत आले आहे.सर्व प्रतिकूल परिस्थितीवर मात करत कादवा ची वाटचाल सुरू असून कादवा ने ऊस बिलाचा दुसरा हप्ता रू.200 प्रती टन प्रमाणे ऊस उत्पादकांचे खाती वर्ग केले असून उर्वरित एफआरपी लवकरच देण्याचा प्रयत्न आहे. ऊस लागवड वाढावी यासाठी उधारीने कंपोष्ट खत वाटप सुरू आहे.शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस लागवड करावी असे आवाहन चेअरमन श्रीराम शेटे यांनी केले. प्रास्ताविक प्र.कार्यकारी संचालक विजय खालकर यांनी मांडले तर कामगार संचालक भगवान जाधव यांनी गळीत हंगाम यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी कामगार सर्वतोपरी प्रयत्न करतील असे सांगितले. कार्यक्रमाप्रसंगी यावेळी व्हा. चेअरमन शिवाजीराव बस्ते, बाजार समिती सभापती प्रशांत कड,संचालक गंगाधर निखाडे, माजी सभापती सदाशिव शेळके,राजेंद्र उफाडे,जयराम डोखळे,सुनील पाटील,शांताराम बारहाते,संतोष रेहरे,विजय डोखळे, दादासाहेब पाटील, बाळकृष्ण जाधव, दिनकरराव जाधव, शहाजी सोमवंशी, विश्वनाथ देशमुख, बापूराव पडोळ, सुखदेव जाधव, सुभाषराव शिंदे, अमोल भालेराव, मधुकर गटकळ, सुनील केदार, राजेंद्र गांगुर्डे, नामदेव घडवजे, रामदास पिंगळ, कामगार संचालक भगवान जाधव, सरचिटणीस अजित दवंगे, माजी कामगार युनियन अध्यक्ष सुनील कावळे, प्रशासकीय सल्लागार बाळासाहेब उगले, आर्थिक सल्लागार जगन्नाथ शिंदे, प्र.चीफ केमिस्ट अर्जुन सोनवणे, शेतकी अधिकारी मच्छिंद्र शिरसाठ, कामगार कल्याण अधिकारी गणेश आवारी, स्थापत्य अभियंता शरदचंद्र चव्हाणके, सचिव राहुल उगले,आरोग्य अधिकारी डॉ. प्रदिप तिडके आदींसह सभासद, युनियन पदाधिकारी अधिकारी कामगार उपस्थित होते.
ऊस बिला पोटी दुसरा हप्ता ऊस उत्पादकांचे खाती वर्ग कादवा ने गेल्या गळीत हंगामातील ऊस एफआरपी बिलापोटी पहिला हप्ता रू. 2500 अदा केला होता आता दुसरा हप्ता रू. 200 प्रमाणे असे एकूण रु 2700 प्रती टन प्रमाणे ऊस उत्पादकांचे बँक खाती वर्ग केली असून उर्वरित रक्कम लवकरच अदा करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले आहे. ऊस लागवड वाढावी यासाठी ऊस विकासाच्या विविध योजना सुरू असून शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस लागवड करत कादवा ला ऊस पुरवठा करण्याचे आवाहन कादवा व्यवस्थापनाने केले आहे.