557 Post Views
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबविण्यासाठी एसव्हीकेटीच्या शिक्षकांसोबत कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांचा संवाद
देवळाली कॅम्प, प्रतिनिधी
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अमृत महोत्सवात प्रदार्पण करणारे विद्यापीठ आहे. महाराष्ट्रतच नव्हे तर भारताच्या बाहेर विद्यापीठाचा विस्तार होतो आहे. शैक्षणिक आदान – प्रदान करण्यासाठी कतार आणि जॉर्जिया देशात विद्यापीठाचे कॅम्पस सुरु झाले आहे. अशी माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी यांनी दिली.
येथील श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया महाविद्यालयास शुक्रवारी [ दि. ५] कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी यांनी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी शिक्षक व शिक्षकेत्तर सेवकांसाठी आयोजित राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाविषयी संवाद साधतांना कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी बोलत होते.
व्यासपीठावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य तथा प्राचार्य डॉ.एस.एस.काळे, मविप्र सेवक संचालक तथा उपप्राचार्य डॉ. एस. के. शिंदे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलास धुर्जड, महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघाचे उपाध्यक्ष वैभव पाळदे आदी होते. कुलगुरु डॉ. सुरेश गोसवी पुढे म्हणाले की, देशात सर्वत्र राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीचे काम सुरु आहे. त्यासाठी कुलगुरू म्हणुन मला महाविद्यालयात भेट देऊन थेट शिक्षकांसोबत संवाद साधावा लागतो आहे.
त्यांच्या अडचणी समजून घ्याव्या लागत आहे. नाशिक जिल्हयातील मराठा विद्या प्रसारक समाज संस्था ११० वर्ष होऊन गेले असून लाखोच्या संख्येने विद्यार्थी संस्थेचे आहे. शैक्षणिक धोरण अंमलबजावणीत संस्थेचे योगदान महत्वाचे असल्याचे गौरोउदगार कुलगुरु डॉ. डॉ. सुरेश गासावी यांनी काढले. दरम्यान महाविद्यालयाच्या शालेय समितीचे अध्यक्ष विलास धुर्जड आणि माजी विद्यार्थी संघाचे उपाध्यक्ष वैभव पाळदे यांच्या हस्ते कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक भाषणात सिनेट सदस्य तथा प्राचार्य डॉ.एस.एस. काळे यांनी महाविद्यालय व मविप्र संस्था यांची जडण – घडण सांगून राष्ट्रिय शैक्षणिक धोरण सर्व समावेशक असल्याचे सांगीतले. यावेळी व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांनी राष्ट्रिय शैक्षणिक धोरणाविषयी आपले विचार मांडले. सुत्रसंचालन उपप्राचार्य डी.टी जाधव यांनी केले. आभार प्रा.एल.डी. देडे यांनी मानले.