एकलहरे रोड वरील जिजामाता महिला शिक्षण प्रसारक व समाजसेवा मंडळ संचलित साधना एज्युकेशन इंग्लिश मिडीयम स्कूल शाळेचा चौदावा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेच्या संस्थापिका स्व. सत्यभामा गाडेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्याचप्रमाणे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार अन् विश्वस्त योगेश गाडेकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करून वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला.
वर्धापनदिना निमित्ताने आयोजित विविध कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या नवीन इमारतीमध्ये करण्यात आले.यावेळी संस्थेच्या सचिव सौ.जयश्री योगेश गाडेकर व संचालक सदस्य सौ. जया रौंदळे , कार्य कारी प्रमुख श्री. योगेश लक्ष्मण गाडेकर व श्री. विशाल लक्ष्मण गाडेकर तसेच शाळेच्या प्रिन्सिपल सौ.सरला खैरनार व व्हाईस प्रिन्सिपल सौ. अंजली घोलप उपस्थित होते.शाळेत पूर्व प्राथमिक,प्राथमिक, माध्यमिक तसेच ज्युनिअर कॉलेज अशा तिन्ही विभागांचे काम चालते.शाळेच्या शैक्षणिक कारकिर्दीस चौदा वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त शाळेच्या शाळेच्या वर्धापन दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी मिसळपार्टीसह सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते.शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध गीते सादर केली.
श्री.योगेश गाडेकरांनी आपल्या मनोगतामध्ये स्व. सत्यभामा गाडेकर यांचे स्मरण करून विद्यार्थ्यांना व पालकांना मार्गदर्शन केले. शाळेच्या प्रिन्सिपल सौ. खैरनार यांनी मुलांच्या शैक्षणिक व सर्वांगिण विकासासाठी मी व माझा शिक्षक वृंद कटीबद्ध आहे असे सांगितले.मयुरी सुपे व साईराज पूरकर या विद्यार्थ्यांनी शब्दसुमनांनी पाहुण्यांचे स्वागत केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षक कु.अश्विन भालेराव व शाळेतील शिक्षिका पूजा मदन यांनी केले.या कार्यक्रमात इयत्ता दहावीतील व बारावीतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार देखील करण्यात आला.वर्धापन दिनानिमित्त पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपण ही करण्यात आले. आभार प्रदर्शन इ.९वी तील विद्यार्थी कु.अरशन शेख व कु. रूद्राक्षी शिंदे यांनी केले.