दिंडोरी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी सौ सुनिता लहांगे यांची बिनविरोध निवड झाली,सौ कल्पना गांगोडे यांनी रोटेशन पध्दतीनुसार राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या नगराध्यक्षपदासाठी सौ सुनिता लहांगे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता,आज झालेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत तहसिलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी मुकेश कांबळे यांनी सौ लहांगे यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली, निवडीनंतर तहसिलदार मुकेश कांबळे मुख्याधिकारी संदीप चौधरी यांच्या हस्ते नवनिर्वाचित नगराध्यक्षांचा सत्कार करण्यात आला.
लहांगेंच्या अर्जावर सुचक म्हणून नगरसेविका आशा कराटे यांची सही होती तर माजी नगराध्यक्षा कल्पना गांगोडे यांची अनुमोदक म्हणून सही होती, यावेळी उपनगराध्यक्ष दिपक जाधव,नगरसेवक सुजित मुरकुटे, अँड प्रदिप घोरपडे, अविनाश जाधव , नितिन गांगुर्डे, अँड गणेश बोरस्ते,सौ मेघा धिंदळे,सौ लता बोरस्ते,सौ ज्योती देशमुख,सौ निर्मला मवाळ,सौ अरुणा देशमुख,सौ माधुरी साळुंखे,सौ शैला उफाडे,सौ प्रज्ञा वाघमारे, स्विकृत नगरसेवक संतोष आंबेकर आदी उपस्थित होते,नगरपंचायत आवारात फटाक्याची आतिषबाजी करून कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.