नाशिक : सध्याच्या युगामध्ये वृक्ष तोड मोठ्या प्रमाणात केली जात आहे विकासाच्या नावाखाली सगळीकडे सिमेंटचे जंगले उभे राहत असल्याचे दिसून येत आहे . त्यामुळे निसर्गाचा समतोल बिघडत आहे. तापमानामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.निसर्गाचा समतोल साधण्यासाठी सर्व नागरिकांनी वृक्षरोपण आणि वृक्ष संवर्धन, याकडे लक्ष पुरविणे गरजेचे आहे. असे आवाहन शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दत्ता गायकवाड यांनी केले.
जेलरोड परिसरातील काही स्थानिक युवक सचिन पवार, संतोष पिल्ले,धनंजय लोखंडे, प्रवीण पवार,गोरख चकोर, गोपी साळी ,सचिन देसले आदींनी एकत्र येत दहा हजार वृक्षांचे रोपण आणि त्याचे तीन वर्ष संवर्धन करण्याचा संकल्प केला आहे. त्या पार्श्वभूमीवर शनिवारी ( दि.८ ) रोजी सकाळी अकरा वाजता जेलरोड परिसरातील रामेश्र्वर नगर,ओमनगर येथे दत्ता गायकवाड यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.त्यावेळी ते बोलत होते. यावेळी येथील तरुणांनी वेगवेगळ्या प्रकारचे वृक्षांचे रोपण केले जाणार असल्याची माहिती दिली. याप्रसंगी मनपा उपायुक्त विवेक भदाने, अतिरिक्त आयुक्त मनपा प्रदीप चौधरी, उद्यान निरीक्षक सचिन देवरे, दिनकर आढाव, माजी नगरसेवक प्रशांत दिवे, माजी नगरसेविका मंगला आढाव, संतोष पिल्ले, सचिन पवार, धनंजय लोखंडे, सचिन देसले, सागर भोजने, तुषार वाघमारे, प्रवीण पवार, गोरख चकोर, गोपी साळी, राजेंद्र दुसाने,आशुतोष आरोटे, शिवम आढाव, शाम महाले, नितीन थोरात जितू पोद्दार, दिलीप आढाव आदींसह ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.