499 Post Views
नाशिकरोड : उमेश देशमुख
प्रभाग १७ मधील शिवसेना शिंदे गटाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ मंत्री दादा भुसे यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला. संपूर्ण महाराष्ट्रात धनगर समाजाच्या बाजूने संघर्ष करून लढा देणाऱ्या यशवंत सेनेचा पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करून महापालिका निवडणुकीत शिवसेनेला पाठिंबा दिला. शहर महानगर प्रमुख रतन हिरे यांनी भुसे यांना पाठिंब्याचे पत्र दिले.

नाशिक महानगर पालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. नाशिकरोड परिसरातील प्रभाग १७ मधील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार राजेश आढाव, सुशीला लोखंडे, विजयता डावरे आणि राहुल कोथमिरे उमेदवार आहे. त्यांच्या प्रचार कार्यालयाचे नुकतेच उदघाटन झाले. त्यावेळी यशवंत सेनेचे शहर प्रमुख रतन हिरे यांनी शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांना पाठिंबा असल्याचे पत्र मंत्री दादा भुसे यांना देत. उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सतत धनगर समाजाच्या बाजूने उभे राहिले आहेत. समाजाच्या समस्या, अडचणी सोडविण्यासाठी प्राधान्य देत आहे. त्यामुळे त्यामुळे यशवंत सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश देऊन शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला आहे. यामुळे निश्चितच धनगर समाज शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांना निवडूण आणण्यास प्रयत्नशील राहील असा विश्वास शिवसेना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
धनगर समाजाकडून शुभसंकेत : राजेश आढाव
शिवसेना शिंदे गटाचे प्रभाग १७ मधील अधिकृत उमेदवार राजेश आढाव यांनी यशवंत सेनेने जाहीर पाठिंबा दिल्याबद्दल आभार व्यक्त केले. आमच्या विजयात धनगर समाज बांधवांचा मोठा सहभाग असेल. त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी शिवसेना शिंदे गट सज्ज आहे.राज्यपातळीवरील तसेच स्थानिक पदाधिकारी यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करून धनगर समाजाच्या यशवंत सेनेने आम्हाला पाठिंबा दर्शवत एकप्रकारे शुभसंकेत दिलेला आहे.



