19.1 C
Nashik
Thursday, February 5, 2026
spot_img

मनसेच्या उमेदवार म्हणतात क्षमस्व !.., निवडणुक नको, मी माघार घेतेय !… खुलासा वाचा, काय आहे खरे कारण..

460 Post Views

नाशिकरोड : उमेश देशमुख

येथील प्रभाग १८ मध्ये महाविकास आघाडीला मोठा राजकीय धक्का सोसावा लागणार असल्याचे दिसते. येथील मनसेच्या अधिकृत उमेदवार रोहिणी संतोष पिल्ले यांनी अचानक माघार घेत निवडणूक न लढविण्याचा अनपेक्षित निर्णय घेतला. याविषयी त्यांनी सोशल मिडिया पोस्ट शेअर करून निवडणूक रिंगणातून का माघार घेतेय. त्याचे स्पष्ट आणि सविस्तर कारण दिले.त्यामुळे महाविकास आघाडीला मोठा राजकीय फटका सोसावा लागणार असल्याचे बोलले जाते आहे.

रोहिणी संतोष पिल्ले प्रभाग १८ ब प्रवर्गातून मनसेच्या अधिकृत उमेदवार होत्या. परंतु काही कारणास्तवत्यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयी त्यांचे पती संतोष पिल्ले यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सद्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चेचा विषय ठरली आहे. मनसेच्या उमेदवाराला निवडणूक रिंगणातून माघार का घ्यावी लागली. उलट सुलट चर्चा केली जाते आहे. परंतु संतोष पिल्ले यांनी रोहिणी पिल्ले निवडणूक का लढविणार नाहीत याविषयी खरे कारण स्पष्ट केले आहे.

वाचा…खरे कारणे काय

मला खूप मोठा निर्णय जड अंत करणाने घ्यावा लागला. माझ्या पक्षाने माझ्यावर दाखवलेल्या विश्वासावर मला खरा उतरता आलं नाही व मला दिलेल्या संधीच सोन करता आल नाही व मला माघारी घ्यावी लागली. तर समस्त जेलरोड व प्रभाग क्रमांक १८ मधील सर्व मायमाऊलीची मी क्षमा मागतो आणि माझ्या पक्षाने जो माझ्यावर प्रेम दाखवल पक्षांनी संपूर्ण सहा प्रभागांमधून माझ्या पत्नीस एकटीला तिकीट दिल त्याच्याबद्दल मी माझ्या पक्षाचा आयुष्यभर ऋणी राहील मी माझ्या जेलरोड मधल्या मायमाऊलींना हात जोडून हीच विनंती करतो की आपण गेल्या वेळेस ४९३६ मतांच जे मला दान दिलं होतं मला विश्वास होता मागील वेळी मी काही कमी राहिलो होतो पण यावेळी माझ्या माय माऊली जनतेने मला नक्की विजय माझ्या पत्नीच्या पदरात दिल असतं परंतु काही कारणास्तव मला हा निर्णय जड अंत करणानी घ्यावा लागला तरी मी सर्व जनतेचे हात जोडून माफी मागतो व आपला आयुष्यभर मी ऋणी राहील आणि सर्व नाशिककरांना एकच विनंती करतो जो सुज्ञ आणि एक उच्चशिक्षित व प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व असलेल्या उमेदवाराला निवडून द्यावे कारण आजची राजकारणाची परिस्थिती बघता ही जी घोड दोड जी चालू आहे ती जनतेसाठी नव्हे तर स्वतःच्या स्वार्थासाठी चालू आहे पक्षनिष्ठा, व्यक्तिनिष्ठा सर्व बाजूला राहिलेली आहे तर मी जास्त बोलण्यासारखं नाही कारण जनता जनार्दन ही सुज्ञ आहे आणि तिला सर्व समजतं तर तिने सर्व गोष्टीचा विचार करून एक चांगल्या उमेदवारास निवडून द्यावे ही नम्र विनंती 🙏🙏🙏 जय हिंद जय महाराष्ट्र.
आपला
संतोष राजेंद्र पिल्ले
महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाशिक जिल्हा

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles