22.6 C
Nashik
Monday, March 23, 2026
spot_img

माजी नगरसेवक सुनील बोराडे यांच्यासह समर्थकांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश ; प्रभाग १८ मध्ये महायुती समोरासमोर! ; बोराडे,भोजने, ताकाटे, पवार, गाडे यांच्या संभाव्य पॅनलची चर्चा

860 Post Views

नाशिकरोड : उमेश देशमुख

माजी नगरसेवक सुनील बोराडे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ना दादा भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे प्रभागाचे राजकीय चित्र काहीसे स्पष्ट होताना दिसते. शिवसेना शिंदे गट आणि भारतीय जनता पक्ष म्हणजेच महायुतीमध्ये समोरासमोर लढत होण्याची शक्यता आहे. शिवसेना शिंदे गटाकडून सुनील बोराडे, ( सर्वसाधारण पुरुष ) सुनीता भोजने ( महिला सर्वसाधारण ) शितल ताकाटे ( इतर मागासवर्ग महिला ) आशा पवार ( अनुसूचित जाती प्रवर्ग ) यांच्या नावाच्या पॅनेलची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली दिसते.

आता महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या पॅनेलची प्रतिक्षा आहे. तर अजितदादा पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रभागात काय भुमिका घेतो. याकडे सर्वांचे लक्ष लागणार आहे.जेलरोड परिसरातील प्रभाग १८ मध्ये महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत अटळ आहे. माजी नगरसेवक सुनील बोराडे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष होते. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश करणे टाळून त्यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. परिणामी त्यांच्या सोबत सागर भोजने यांच्या पत्नी सुनीता भोजने आणि शिवा तकाटे यांच्या पत्नी शितल ताकाटे आणि नाशिकरोडचे माजी सभापती पवन पवार यांच्या मातोश्री आशा चंद्रकांत पवार यांच्या नावाच्या पॅनेलची चर्चा जोरात आहे. यामध्ये ऐनवेळी काही बदल होऊ शकतात का ते पहावे लागेल. शिवसेना शिंदे गटामध्ये सागर भोजने आणि शिवा ताकाटे मागील दहा वर्षापासून सार्वजनिक जीवनात सक्रीय सहभाग नोंदवत आहे. त्यांना यावेळेला नगरसेवक करण्याचा निर्धार त्यांच्या कार्यकर्त्यांचा आहे. त्यामुळे एक तरुण वर्ग आणि नवीन कार्यकर्त्यांचा गट शिवसेना शिंदे गटाला मिळू शकतो. त्याचप्रमाणे नाशिकरोडचे माजी प्रभाग सभापती सुनील बोराडे आणि पवन पवार यांचे कार्यकर्ते देखील सक्रीय झालेले दिसतात. प्रभाग १८ मध्ये महायुती मध्ये कडवी झुंज अपेक्षित असून महाविकास आघाडी आणि अजित दादा पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणते उमेदवार देणार यावर प्रभागाच्या जय पराजयाचे गणित अवलंबून दिसते.

दरम्यान बोराडे यांच्या सोबत शंकरराव बोराडे,बाळासाहेब डेरले, साहेबराव मोरे,संजय बोराडे,दिगंबर बोराडे,नितीन बोराडे,दिनेश जाधव ,भूषण बचावल रामनाथ बोराडे,वाळू पाटील बोराडे,कल्पेश बोराडे,सौरभ डेरले. गणेश शिंदे,प्रवीण जाधव ,सचिन गवई,भूषण मराठे,विष्णू लोंढे,पंकज जाधव ,शुभम पगारे यांच्या सह असंख्य कार्यकर्ते यांनी प्रवेश केला.याप्रसंगी पूर्व विधानसभा प्रमुख श्री बाबुराव आढाव, शिवा ताकाटे,सागर भोजने ,धीरज पन्हाळे,रवी कुमावत,चंदू बोराडे,अतुल चव्हाण,जमील शेख,भास्करनाना बोराडे,यश बोराडे , अनुज बोराडे आदी उपस्थित होते.

शिवा गाडे की आशा पवार ?

शिंदे गटाच्या शिवसेनेकडून अनुसूचित जाती प्रवर्गातून आशा पवार यांचे नाव घेतले जात आहे. मात्र शिवा गाडे यांनी देखील शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे गाडे की पवार असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. ऐनवेळी पक्षाचे वरिष्ठ नेते आशा पवार किंवा शिवा गाडे या दोघांपैकी कोणाच्या बाजूने कौल देतात त्यावर हा प्रश्न मिटू शकतो.

ताकदवर पॅनेल देणार : विनायक ( बाबुराव ) आढाव

शिवसेना शिंदे गटाचे नाशिक पूर्व विधानसभा प्रमुख विनायक ( बाबुराव ) आढाव यांनी माजी नगरसेवक सुनील बोराडे यांच्या प्रवेशा संदर्भात प्रतिक्रिया देताना सांगितले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि स्थानिक शहर पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग १८ मध्ये ताकदवर पॅनेल देणार आहोत. सुनील बोराडे यांच्या प्रवेशाने पक्षाला बळकटी मिळेल.असे आढाव यांनी स्पष्ट केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles