74 Post Views
नाशिक रोड : उमेश देशमुख
प्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ तसेच नाशिकरोड देवळाली व्यापारी बँकेचे उपाध्यक्ष व सुप्रेम फाऊंडेशन चे अध्यक्ष डॉ. प्रशांत भुतडा यांची इंडियन रेडक्रॉस सोसायटी , नाशिक जिल्हा शाखेच्या कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली . रेडक्रॉसच्या कार्यकारिणी बैठकीत या निवडीची घोषणा करण्यात आली.
माजी कोषाध्यक्ष मेजर पी. एम. भगत यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पदावर सर्वानुमते ही निवड करण्यात आली. रेडक्रॉस चेअरमन डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी , सचिव डॉ. सुनील औंधकर , व्हाईस चेअरमन डॉ. चंद्रशेखर नामपूरकर , कार्यक्रम समन्वयक डॉ. प्रतिभा औंधकर , आनंद भट्टड आदींच्या उपस्थितीत सदर नियुक्तीचे पत्र डॉ. भुतडा यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले . ” मेजर भगत सरांनी रेडक्रॉस साठी केलेल्या आदर्श कामाला समोर ठेवून रेडक्रॉसला अधिकाधिक सक्षम बनविण्यासाठी मी कटिबद्ध राहीन” असे प्रतिपादन डॉ. भुतडा यांनी याप्रसंगी केले . या निवडीबद्दल डॉ. प्रशांत भुतडा यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे .



