17.7 C
Nashik
Thursday, February 5, 2026
spot_img

राष्ट्रवादीचे अतुल मते भाजपात प्रवेश करणार ! ; प्रभाग दोनचे राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता

435 Post Views

नाशिकरोड : उमेश देशमुख

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते अतुल मते यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नाशिक महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणूक तोंडावर प्रवेश होऊ शकतो. त्यांचा प्रवेश झाल्यास प्रभाग दोन मधील राष्ट्रवादी आणि भाजप पक्षांतर्गत राजकीय समीकरणे बदलली जाणार आहे. त्यामुळे त्यांचा भाजप प्रवेश होईल किंवा नाही याकडे लक्ष लागुन आहे.

मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी अतुल मते नाशिक पूर्व विधानसभा मतदार संघामधून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक होते. परंतु गणेश गिते यांना उमेदवारी मिळाल्याने त्यांना माघार घ्यावी लागली. आडगाव येथे त्यांनी शरद पवार यांच्या जाहीर सभेचे देखील आयोजन केले होते. तेंव्हापासून अतुल मते या परिसरात प्रसिध्दीच्या झोतात आले आहेत. सद्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकेचा ज्वर सर्व पक्षीय कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेला दिसतो.नाशिक महापालिकेच्या निवडणुकीची चर्चा देखील जोरात असून कार्यकर्त्यांतर्फे इच्छुकांच्या नावाची चर्चा होताना दिसते. यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी अतुल मते यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा जोर धरू लागली आहे. यात कितपत सत्यता आहे.हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.

दिंडोरी तालुक्यातील उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते माजी आमदार रामदास चारोस्कर, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाशिक युवा जिल्हाध्यक्ष श्यामराव हिरे, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिंडोरी तालुका अध्यक्ष राजेंद्र ढगे,सिन्नर विधानसभा निवडणूक लढविणारे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उदय सांगळे यांनी भाजपमध्ये नुकताच प्रवेश केला आहे. त्या अनुषंगाने नाशिक महापालिका क्षेत्रातील कार्यकर्ते भाजप मध्ये प्रवेश करण्यास इच्छूक आहे.तसेच इतर पक्षातील मनपा निवडणुकीत प्रभावी ठरणाऱ्या काही कार्यकर्त्यांच्या संपर्कात शहर भाजपचे काही पदाधिकारी असून ते प्रवेशासाठी चाचपणी करीत आहे. त्यात अतुल मते यांच्या सारख्या कार्यकर्त्यांचा समावेश असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होताना दिसते.

मते यांच्या कार्यकर्त्यांचा दावा
प्रभाग दोन मध्ये आडगाव, नांदूर व मानूर ही तीन महत्वाची गावे असून येथे अतुल मते यांचे नातेगोते आहे. तसेच मते बांधकाम व्यावसायिक असून कोणार्क नगर,श्रीराम नगर, या शहरी परिसरात मते यांचा बांधकाम व्यवसाय आहे. त्यांचा दांडगा जनसंपर्क जमेची बाजू असल्याचा दावा त्यांच्या कार्यकर्त्यांचा आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles