28.3 C
Nashik
Thursday, February 5, 2026
spot_img

नाशिक शहर काँग्रेस मधील अंतर्गत राजकारण चव्हाट्यावर ! ; नाशिकरोड अन् सातपूर ब्लॉक अध्यक्ष बदलल्याने नाराजीचा सुर

492 Post Views

नाशिकरोड : उमेश देशमुख

राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नाशिक शहर अध्यक्ष आकाश छाजेड यांनी नाशिकरोड आणि सातपूर येथील ब्लॉक अध्यक्ष बदलून नवी नियुक्ती केली. त्यामुळे शहर काँग्रेसचे अंतर्गत राजकारण चव्हाट्यावर आलेले दिसते. नवीन नियुक्ती काँग्रेस पक्षाच्या पक्षीय घटनेनुसार बेकायदेशीर असून आम्हीच अध्यक्ष आहोत. अशी भुमिका नाशिकरोड अध्यक्ष दिनेश निकाळे आणि सातपूर अध्यक्ष कैलास कडलग यांनी घेत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे नवीन नियुक्त्या रद्द करण्याची लेखी मागणी केली आहे.

नाशिक शहर काँग्रेस अध्यक्ष छाजेड यांनी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना चुकीची माहिती देऊन आणि स्थानिक तसेच प्रदेश पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता नाशिकरोड–देवळाली ब्लॉक अध्यक्ष म्हणून किरण जाधव,आणि सातपूर ब्लॉक अध्यक्ष म्हणून माया काळे यांची नियुक्ती केली आहे. निकाळे आणि कडलग यांनी छाजेड यांनी केलेल्या नियुक्तीलाच आव्हान दिले आहे. त्यांनी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे लेखी तक्रार देत नियुक्ती रद्द करण्याची मागणी केली आहे.

या संदर्भात दोघांनी प्रदेश काँग्रेस वरिष्ठ उपाध्यक्ष ॲड गणेश पाटील यांच्याशी चर्चा केली असून लवकरच सकारात्मक निर्णय होईल, असे आश्वासन दिले आहे. नव्याने झालेल्या नियुक्त्या चुकीच्या असल्याचे त्यांनी मान्य केल्याचा दावा केला जातो आहे. येत्या काही दिवसात स्थानिक प्रदेश पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन देऊन निवेदन स्वीकारले असे निकाळे आणि कडलग यांनी प्रसिद्धी पत्रकार म्हटले आहे.

आमची निवड २०२७ पर्यंत

दरम्यान २२ डिसेंबर २०२२ रोजी पक्षांतर्गत लोकशाही पद्धतीने झालेल्या निवडणुकीत आम्ही निवडून आलो आहोत. आमचा कार्यकाळ २०२७ पर्यंत असताना कोणतेही कारण न देता, कोणतीही लेखी नोटीस अथवा कारणे दाखवा पत्र न देता शहर अध्यक्षांनी द्वेषापोटी आणि सूडबुद्धीने पक्षीय घटनाबाह्य नियुक्ती केली आहे.

आम्हीच ब्लॉक अध्यक्ष !

लोकशाही,काँग्रेस पक्षीय घटना व विचारधारा याचा आदर करतो.जोपर्यंत आपल्याला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीकडून लेखी स्वरूपातील कारणे दाखवा नोटीस देत नाही. तोपर्यंत आपण काँग्रेस पक्ष घटनेनुसार अध्यक्ष आहोत.त्यामुळे चुकीची माहिती देऊन काल्पनिक नियुक्तीपत्रांचा विचार न करता ब्लॉक अध्यक्ष म्हणून आम्हीच काम करणार असल्याचे निकाळे आणि कडलग यांनी म्हटले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles