28.3 C
Nashik
Thursday, February 5, 2026
spot_img

आयटीआयच्या विद्यार्थ्यांना विद्युत सुरक्षेचे धडे !; महावितरणच्या सुरक्षा व प्रशिक्षण केंद्राचा उपक्रम

153 Post Views

नाशिकरोड : प्रतिनिधी  

“विद्युत सुरक्षा ही काळाची गरज असून, विद्यार्थी हेच पुढील काळातील विद्युत सुरक्षा दूत ठरणार आहेत” असे प्रतिपादन महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता (सुरक्षा) डॉ. जितेंद्रकुमार राठौर यांनी केले.औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांना विद्युत सुरक्षेचे धडे देण्यासाठी महावितरणच्या प्रशिक्षण व सुरक्षा विभाग, एकलहरेच्या पुढाकाराने विद्युत सुरक्षा मार्गदर्शनपर कार्यशाळांचे आयोजन करण्यात येत असून, याअंतर्गत औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सिन्नर येथे नुकतेच आयोजित कार्यशाळेत डॉ. राठौर यांनी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना विद्युत सुरक्षा विषयक महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. 

औद्योगिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे विद्यार्थी शिक्षण घेतल्यानंतर त्याच परिसरात काम करतात. अश्या विद्यार्थ्यांना  विद्युत सुरक्षेचे प्रशिक्षण दिल्यास संभाव्य धोके टाळता येईल या संकल्पनेतून महावितरणच्या सुरक्षा  व प्रशिक्षण केंद्राचे  मुख्य महाव्यवस्थापक अरविंद भादीकर यांनी  प्रथमच अशाप्रकारचे प्रशिक्षण घेण्याचे निर्देश दिलेले असून कार्यकारी अभियंता प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण होणार आहे.

 या कार्यशाळेत  विद्युत अपघात टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी, नादुरुस्त उपकरणांपासून होणारे धोके, शॉर्टसर्किटमुळे लागणारी आग, पावसाळ्यात विद्युत वितरण यंत्रणेपासून सुरक्षित अंतेर , घरातील वायरिंग सुरक्षित ठेवणे, एकाच ठिकाणी अनेक उपकरणे न जोडणे आणि  RCCB सारखी सुरक्षा उपकरणे वापरणे इत्यादी बाबींबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देवून  ,त्यांच्या शंकाचे  निरसन करण्यातआले. तसेच अपघात प्रसंगी घ्यावयाची खबरदारी, विजेचा धक्का बसल्यास प्रथमोपचार, प्रात्यक्षिकांद्वारे विद्यार्थ्यांना कनिष्ठ अभियंता अफसर शेख यांनी प्रात्यक्षिकाद्वारे समजावून सांगितले. कार्यशाळेचे प्रास्ताविक  प्राचार्य एस. एम. आथरे यांनी  केले. पर्यवेक्षक बी. एस. गडाख, उपकार्यकारी अभियंता राकेश  फिरके, गट निदेशक के. व्ही.  वाकचौरे यांची उपस्थिती व सहकार्य लाभले. कार्यशाळेत संस्थेतील विद्यार्थी व शिक्षक  सहभागी झाले होते. औद्योगिक परिसरातील तांत्रिक प्रशिक्षण संस्थांच्या विद्यार्थ्यांना विद्युत सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी मार्गदर्शन हवे असल्यास, महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता (सुरक्षा), प्रशिक्षण व सुरक्षा नाशिक, डॉ. जितेंद्रकुमार राठौर (मो. ७७६८०००१२७ ) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणच्या सुरक्षा व प्रशिक्षण विभागातर्फे करण्यात आले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles