28.3 C
Nashik
Thursday, February 5, 2026
spot_img

भाजप युवा मोर्चाचा विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याचा संकल्प ; आमदार ॲड राहुल यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

123 Post Views

नाशिक रोड : प्रतिनिधी
भाजपा युवा मोर्चा, नाशिक रोड मंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासात हातभार लावण्यासाठी आयोजित शालेय साहित्य वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार ॲड. राहुल (भाऊ) ढिकले यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम जेलरोड येथील मनपा शाळा क्र.५६ येथे पार पडला.दरम्यान यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांतर्फे विद्यार्थ्यांच्या उज्वल भवितव्याचा संकल्प राबविण्याचा मनोदय व्यक्त करण्यात आला.

या कार्यक्रमात आमदार राहुल (भाऊ) ढिकले यांनी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून त्यांच्याशी संवाद साधला व पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य, हातात ज्ञानाची साधने आणि मनात नवीन स्वप्ने रुजवणारा हा उपक्रम ठरला.

सदर कार्यक्रमास भाजपा नाशिक रोड मंडळ अध्यक्ष श्री. शांताराम घंटे, ज्येष्ठ माजी नगरसेवक श्री. दिनकर आप्पा आढाव, श्री. संभाजीराव मोरुस्कर, श्री. शरद मोरे सर, श्री. पंडितराव आवारे, श्री. अंबादास पगारे, श्री. सुनिल आडके, श्री. मंगेश मोरे, श्री. राहुल कोथमिरे, श्री. संतोष कांबळे, श्री. बापू सापुते, श्री. संदीप पाटील, श्री. योगेश रसाळ,दीपक जाधव व युवा मोर्चा महिला अध्यक्ष ऋजुता चव्हाण,सुजाता जोशी, ऋषिकेश नारद तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.

अध्यक्ष निसाळ यांच्या तर्फे आयोजन

या उपक्रमाचे आयोजन भाजपा युवा मोर्चा, नाशिक रोड मंडळाचे अध्यक्ष शंतनु ज्ञानेश्वर निसाळ यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सतत उपक्रम राबविण्याचा संकल्प व्यक्त करत हा कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles