28.3 C
Nashik
Thursday, February 5, 2026
spot_img

नाशिकरोड मंडळाचा वसतिगृहातील वंचित विद्यार्थ्यांसोबत रक्षाबंधन उपक्रम

304 Post Views

नाशिकरोड : प्रतिनिधी

येथील भारतीय जनता पक्षाच्या नाशिकरोड मंडळातर्फे रक्षाबंधनाचे औचित्य साधत रविवारी ( दि.१० ) येथील नेताजी सुभाषचंद्र भोष वसतिगृहात विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. नाशिकरोड मंडळाचे अध्यक्ष शांताराम घंटे यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी विद्यार्थ्यांचे औक्षण करून राखी बांधून रक्षाबंधन साजरा करण्यात आला. हातात राखी बांधून खाऊ मिळाल्यामुळे वसतिगृहातील विद्यार्थी आणि सेवक यांचे चेहरे आनंदित झाले. भाजप नाशिकरोड मंडळ, युवा मोर्चा, महिला मोर्चा व अनुसूचित मोर्चाचे पदाधिकारी, सदस्यांचे योगदान मिळाले. याप्रसंगी कोमलताई मेहरोलिया, अंबादास पगारे, मंडळ पदाधिकारी राम डोबे, योगेश कपिले,ज्योतीताई चव्हाणके, सुजाताताई जोशी, सुनीताताई पगारे,संग्राम फडके, रामदास गांगुर्डे,नितिन चव्हाणके,यशोदा पर्वतकर, किरण देशमुख, दिपक जाधव,प्रीतम जाधव, बंटी भडांगे, सचिन शेजवळ अमरेंद्र तल्लम, प्रदीप जाचक,सीमाताई डावखर, गायत्रीताई पगार, विनोद नाजरे, शरद जगताप , भावनाताई नारद, ऋषिकेश नारद तसेच वसतिगृह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles