येथील मानोरी गावात श्री चैतन्य टेक्नॉलॉजी स्कूल या संस्थे तर्फे शासनाची कोणतीही अधिकृत परवानगी न घेता शाळेची स्थापना केलेली आहे. या संस्थेच्या माध्यमातूनविद्यार्थी व पालकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असल्याची चर्चा केली जाते आहे. भविष्यात ही शाळा बंद झाल्यास विद्यार्थी व पालकांचे मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे या शाळेची तत्काळ चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी असलेले निवेदन अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे युवा अध्यक्ष लकी जाधव यांच्यासह शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी जलद शर्मा यांना दिले.
निवेदनातील आशय असा सदर शाळा आंध्र प्रदेश येथील पाकल संस्थेची असून, ६० हजारांच्या आसपास विद्यार्थी प्रवेश फी आहे. शाळेला मान्यता नसतानाही त्यांनी बेकायदेशीर स्टॅम्प बनवला आहे. शाळेची संबंधित संस्थेबाबत यापूर्वी अनेकदा तक्रारी करण्यात आलेल्या आहेत. परंतु कोणतीही कार्यवाही झालेली नाही. याबाबत तत्काळ दखल घेत योग्य ती कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा देण्यात आलेला आहे.दरम्यान इंटरनेटवर माहिती घेतली असता सदर शाळेची माहिती ऑनलाइन दिसून दिसत नसल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे यासंदर्भात चौकशी करून दोषीवर गुन्हा दाखल करण्यात यावा.अशी मागणी निवेदनकर्त्यांनी केली आहे.
चौकशी समिती स्थापन करावी. शाळेकडून विद्यार्थी व पालकांची फसवणूक होऊ नये. याविषयी कार्यवाही न झाल्यास शाळेच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अ. भा. आदिवासी विकास परिषदेचे युवा अध्यक्ष लकी जाधव यांनी दिला.
आठवड्यात मान्यता मिळेल चैतन्य टेक्नो स्कूल संस्थेच्या मानोरी येथील शाळेच्या परवानगीचा प्रस्ताव शिक्षण उपसंचालक तसेच मंत्रालयात मंजुरीसाठी पाठविलेला आहे. परंतु काही तांत्रिक कारणामुळे अद्याप मंजुरी मिळालेली नाही. यासंदर्भात नाशिकचे जिल्हाधिकारी यांना पत्राद्वारे कळविले आहे. तसेच या आठवड्यात शाळेच्या मान्यतेची परवानगी नक्की मिळेल. शाळेत सध्या 231 विद्यार्थी आहे. असा खुलासा चैतन्य टेक्नो स्कूलचे व्यवस्थापक आदिनारायण यांनी नाशिक बातमीदार न्यूज सोबत बोलताना दिला.