23 C
Nashik
Thursday, February 5, 2026
spot_img

शेतकऱ्यांचा हक्काच्या जमिनींचा लिलाव कराल तर रस्त्यावर उतरणार ! ; माजी सरपंच पंढरीनाथ पा. जमधडे यांचा इशारा

349 Post Views

विक्रम पासलकर : इगतपुरी तालुका

मुंबई शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी इगतपुरी तालुक्यातील वैतारणा या दगडी धरणासाठी संपादित केलेल्या मात्र वापरा अभावी पडुन असलेल्या अतिरिक्त जमिनीचां लिलाव होणार असल्याची चर्चा सध्या सुरु असुन यामुळे आवळीसह परिसरातील बाधित तब्बल वीस ते बावीस गावामधील शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. संबंधित सर्वच प्रकल्पबाधित हवालदिल झालेले असून या जमीनी परत कराव्या अन्यथा रस्त्यावर उतरून जाब विचारावा लागेल असा इशारा प्रकल्प बाधित गावचे शेतकरी पंढरीनाथ जमधडे यांच्यासह शेकडो बाधित शेतकऱ्यांनी दिला आहे.

याबाबत आमदार हिरामण खोसकर यांनी विधिमंडळ सभेत आवाज उठवावा अशीही मागणी केली आहे. या जमिनी आमच्या हक्काच्या असुन आम्ही त्यांचा लिलाव होऊ देणार नाही.शासन दरबारी तसे प्रयत्न झाल्यास ते हाणुन पाडु. प्रसंगी शेतकरी रस्त्यावर उतरतील असा खणखणीत इशारा आवळी दुमालाचे माजी सरपंच जमधड़े यांनी दिला आहे.

संपादित जमिनींची पार्श्वभूमी 

१९७२ साली वैतारणा दगडी धरणाचे काम झाले.या धरणाच्या कामासाठी माती व दगड आदी साहित्यासाठी धरण लाभ क्षेत्रा व्यतिरिक्त तब्बल १८५० हेक्टरचे क्षेत्र पाठबंधारे विभागाचे वतीने संपादित करणेत आले होते. सदरचे काम पुर्ण झाले व नंतर वापरा अभावी पडुन असलेल्या अतिरिक्त जमिनी या मुळ मालक वा त्यांचे वारसदार यांना परत करावेत असा आदेश असतानांही महसुल विभागाने पन्नास वर्ष उलटल्यानंतरही अदयापही या जमिनी मुळ मालकानां परत दिलेल्या नाहीत.या धरणाचे माध्यमातुन विस्थापित झालेल्याचें पुरेसे पुनर्वसनही झालेले नाही.रोजगार देण्याचे आश्वासनही फोल ठरले आहेत.आज या प्रकल्पबाधित  चौथी पिढी उलटुनही समस्या सुटलेली नाही.प्रकल्प बाधितांचा जगण्याचा प्रश्न तर सरकारने केलाच नाही, या उलट हयाच दगडी धरणाला लगत मुकणे धरण बांधुन प्रकल्प बाधिताच्यां संख्येत भर घालणारा अन्याय सरकारने केला.आज या अतिरिक्त जमिनीच्या आधारावर वैतारणा प्रकल्प बाधिताचीं गावे, वाडी, वसत्या वसलेल्या आहेत.व अतिरिक्त संपादित जमिनीवरच उदरनिर्वाह सुरु आहे.दरम्यान आदिवासी बांधवाच्या या जमिनीवर धनदांडग्याचा डोळा असुन शासनाची मालकी असलेल्या या जमिनीचां लिलाव करुन त्या लाटण्याचे उदयोग भु माफियाचें संगनमताने सुरु असुन येथील गोर गरिब आदिवासी, सामान्य जनतेला देशोधडीला लावण्याचे कारस्थान सुरु असल्याची चर्चा जोर धरत आहेत.

आमदार खोसकर यांनी लक्ष घालावे

ईगतपुरी तालुका हा १३ धरणांलह विविध प्रकल्पाचां तालुका आहे.या प्रकल्पामुळे येथील आदिवासी व सामान्य शेतकरी देशोधडीला लागला आहे.संपादित मात्र विनावापर पडुन असलेल्या जमिनीच्यां सहायाने प्रकल्पबाधित कसाबसा तग धरुन आहे.आमदार हिरामन खोसकर यांनी मागील कार्यकाळात या जमिनी परत मिळवुन देण्याचे आश्वासन दिले होते.त्या आश्वासनाची पुर्तता त्यांनी करावी अशी मागणी शेतकरी नेते पंढरीनाथ पा. जमधडे यांनी केली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles