587 Post Views
नाशिक रोड : उमेश देशमुख
१९ फेब्रुवारीला होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीची जय्यत तयारी सुरू झाली आहे. त्यासाठी भव्य मंडप व शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याभोवती सजावट सुशोभीकरण व रंगमंच उभारणी कामाचा शुभारंभ शिवजन्मोत्सव समिती अध्यक्ष योगेश गाडेकर, जयश्री गाडेकर यांचे हस्ते विधीवत पूजा करून छत्रपती शिवाजी महाराज चौकात करण्यात आला. खासदार राजाभऊ वाजे, नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेचे चेअरमन दत्ता गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती यावेळी होती.

यानिमित्ताने परिसर भगवामय करण्यात येणार असून, ठिकठिकाणी भव्य कमानी व प्रवेशद्वार उभारण्यात येणार आहे. गणेश तिदम यांचे मार्गदर्शनाखाली शिंदखेड येथील राजमाता जिजाऊ जन्मस्थान येथील भव्य आकर्षक देखावा व रंगमंच साकारण्यात येणार आहे. तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आकर्षक व लक्षवेधी ठरणारे रंगमंचही उभारण्यात येणार आहेत.
यावेळी खासदार राजाभाऊ वाजे, व्यापारी बॅकेचे अध्यक्ष दत्ता गायकवाड, माजी आमदार योगेश घोलप, निवृत्ती आरिंगळे, मनोहर कोरडे, विकास भागवत, राजेश फोकणे, किशोर जाचक, कृष्णा लवटे, शिवाजी हांडोरे, माजी नगरसेवक संभाजी मोरुस्कर, सूर्यकांत लवटे, विशाल संगमनेरे, अंबादास पगारे, असलाम मनियार, कन्हैया साळवे, सुनील आडके, सुधाकर जाधव, नितीन खोले, शंतनू निसाळ, संतोष क्षीरसागर, जयंत गाडेकर, राहुल ताजनपुरे, नितीन पाटील, राम गायकवाड, अतुल घोंगडे, नितीन खर्जुल, साहेबराव खर्जुल, अमोल पारिख, संदेश भागवत, श्याम गोहाड, बाळासाहेब म्हस्के, बंटी कोरडे, नितीन चिडे, बापू सातपुते, संतोष शिरसागर, योगेश भोर, शेखर पवार,अमर जमधाडे, प्रशांत बारगळ, लंकेश गाडेकर , संतोष वाकचौरे, आदी उपस्थित होते.संयोजन समितीचे उपाध्यक्ष राहुल लवटे, विशाल सातभाई, खजिनदार अभय खालकर, सरचिटणीस प्रशांत कळमकर, चिटणीस गोकुळ नागरे यांनी केले.



