602 Post Views
नाशिकरोड : उमेश देशमुख
नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार अँड राहुल ढिकले यांना मतदार दुसऱ्यांदा संधी देऊन महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळात नाशिक पूर्व मतदार संघाचे प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी मोठ्या विश्वासाने पुन्हा एकदा त्यांच्यावर सोपवतील, असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे युवा पदाधिकारी राजेश आढाव यांनी व्यक्त केला.
नाशिक पूर्व विधानसभा मतदार संघात आमदार अँड राहुल ढिकले यांच्या कार्यकाळात विकास कामे झालेली आहे. या मतदारसंघात धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढाई आहे. आमदार ढिकले यांनी विकास कामे केल्यामुळे जनता जनार्दन त्यांच्याच पाठीमागे उभी असल्याचे वातावरण मतदारसंघात आहे. विरोधकांनी कितीही गाजावाजा केला, धनशक्तीचा उपयोग केला तरी त्याचा काडीमात्र फायदा होणार नाही. असा मतदारसंघातील सामान्य जनतेला विश्वास आहे. पैसा हे काही सर्वस्व नाही ,पैशापेक्षा जनसामान्यांच्या अडीअडचणीच्या वेळेस धावून जाणारा राजकीय नेता महत्त्वाचा असतो. आमदार ढिकले यांनी विकास कामासोबतच जन माणसाला भेडसावणाऱ्या अडचणी वर मार्ग काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. आमदार ढिकले यांचे वडील उत्तमराव ढिकले मोठे राजकीय व्यक्तिमत्व होते. सामान्य जनतेची नाळ त्यांना माहीत होती. त्यांच्याकडून ढिकले यांना बाळकडू मिळालेले आहे. सामान्य जनतेसोबत संपर्क कशाप्रकारे ठेवावा, हे आमदार ढिकले यांना चांगले माहिती आहे. त्यामुळेच जनसामान्यांमध्ये आमदार ढिकले यांची प्रतिमा उज्वल आहे. त्याचा परिणाम म्हणून नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये पुन्हा एकदा आमदार राहुल ढिकले मोठ्या मताधिक्याने विजय होतील,असे राजेश आढाव यांनी म्हटले.
नांदूर मानूर परिसरात विवाह समारंभासाठी एकमेव सुसज्ज संजीवनी ए.सी. बँक्वेट मंगल कार्यालय