397 Post Views
नाशिकरोड : उमेश देशमुख
देवळालीतून आमदार सरोज आहिरे यांना पुन्हा विधानसभेवर पाठवण्यासाठी महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते पहिल्या दिवसापासून जोरदार प्रचार करत आहे. यासाठी सर्वानी मेहनत घेतली आहे. या मेहनतीमुळेच आमदार सरोज आहिरे प्रचंड मताधिक्याने विजयी होतील. आणि विजयाचा गुलाल आपणच उधळणार, असा विश्वास राष्ट्रवादी अजित पवार गटाचे युवा नेते विक्रम कोठुळे यांनी मत व्यक्त केले.
सोमवारी ( दि.१८ ) सकाळी आमदार सरोज आहिरे यांची सौभाग्यनगरसह परिसरात जंगी प्रचार रॅली निघाली, यावेळी ठिकठिकाणी त्यांचे स्वागत करुन महिलांनी औक्षण केले. रॅलीत मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विशेषत: महिला, नागरिक स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले. विक्रम कोठुळे म्हणाले, देवळालीत विकासगंगा सरोजताई आहिरे यांच्यामुळे आली. यापूर्वी मतदारांची कोणतीही कामे असताना, ती घेऊन कोणाकडे जावी. हे समजत नव्हते. त्यामुळे त्यांच्या पदरी फक्त निराशाच होती. परंतु आहिरे या विधानसभेवर निवडून जाताच. खऱ्या अर्थाने देवळाली मतदारसंघाला अभिप्रेत असलेला विकास त्यांनी करुन दाखवल्याचे प्रतिपादन कोठुळे यांनी केले. आहिरे यांनी जी कामे अशक्य होती, ती प्रशासन दरबारी मांडत प्रसंगी आक्रमक होऊन मतदारसंघातील जनतेच्या साम्स्या प्रशासन दरबारी योग्य तर्हेने मांडल्या. म्हणूनच जी कामे हो ऊ शकली नाहीत. ती त्यांच्यामुळे झाली.
नांदूर मानूर परिसरात विवाह समारंभासाठी एकमेव सुसज्ज संजीवनी ए.सी.बँक्वेट मंगल कार्यालय