405 Post Views
सिन्नर : प्रतिनिधी
महाविकास आघाडीचे उमेदवार उदय सांगळे तरुण आणि उदयन्मुख नेतृत्व आहे. त्यांना सिन्नर मतदार संघातील समस्यांची उत्तम जाणीव आहे. सिन्नरच्या सर्वांगीण विकासाला गती मिळावी, यासाठी उदय सांगळे यांना राज्याच्या विधानसभेत सिन्नरचे प्रतिनिधित्व करण्यासाठी पाठवावे, असे आवाहन आमदार रोहित पवार यांनी केले.
शनिवारी ( दि.१७ ) सिन्नर मतदार संघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार उदय सांगळे यांच्या प्रचारासाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी आमदार रोहित पवार बोलत होते. आमदार पवार पुढे म्हणाले की, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणे अत्यंत आवश्यक आहे. विद्यमान महायुती सरकारने राज्यातील उद्योगधंदे, व्यवसाय गुजरातला दान केले आहे.त्यामुळे महाराष्ट्रात बेरोजगारीचे प्रमाण वाढलेले आहे. जवळपास आठ ते नऊ लाख कोटीचे प्रकल्प गुजरात मध्ये गेले. त्याविषयी महायुतीचा एक नेताही बोलत नाही. यासाठी आपण महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार उदय सांगळे यांना प्रचंड मताधिक्याने निवडून देऊन सिन्नरचे नेतृत्व करण्यासाठी विधानसभेत पाठवावे. उदय सांगळे यांचे सामाजिक,राजकीय क्षेत्रात भरीव योगदान आहे. त्यांचा जनसंपर्क उत्तम आहे.काम करण्याची त्यांच्याकडे हातोटी आहे. सिन्नर साठी आपण काहीतरी वेगळे करून दाखवू,अशी त्यांच्यात उर्मी आहे. सिन्नरच्या अडचणी, समस्या सोडवण्यासाठी तसेच विकासासाठी उदय सांगळे यांनाच आपण विधानसभेत पाठवावे, असे आवाहन आमदार रोहित पवार यांनी केले. याप्रसंगी कोंडाजी मामा आव्हाड,गोकुळ पिंगळे,बाळासाहेब वाघ,संजय इंदुलकर,नईम खान,काशिनाथ कोरडे,दिनेश धात्रक,संजय सोनावणे,राजाराम मुरकुटे,संजय सानप,संगीता गायकवाड,समाधान वारुंगसे,दीनानाथ उगाडे आदी उपस्थित होते.
नांदूर मानूर परिसरात विवाह समारंभासाठी एकमेव सुसज्ज संजीवनी ए.सी. बँक्वेट मंगल कार्यालय