894 Post Views
नाशिकरोड : उमेश देशमुख
देवळाली विधानसभा मतदार संघातील महायुतीच्या अधिकृत उमेदवार आमदार सरोज अहिरे यांना शिवसेना शिंदे गटाने पाठिंबा जाहीर केला आहे. यासंदर्भात शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी प्रसिद्धी पत्र काढले आहे. त्यामुळे आता शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आमदार सरोज यांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घ्यावा लागणार आहे. शिंदे गटाने पाठिंबा दिल्यामुळे आमदार सरोज अहिरे यांच्या ताकतीत निश्चितपणे भर पडणार आहे. अशी चर्चा केली जात आहे.
देवळाली विधानसभा मतदारसंघात आमदार सरोज अहिरे यांचा जोरदार प्रचार सुरू आहे.आमदार अहिरे या महायुतीच्या अधिकृत उमेदवार आहेत. महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना शिंदे गट तसेच रिपाई आठवले गटासह आदी विविध पक्षांचा समावेश आहे. मात्र शिवसेना शिंदे गटाने अपक्ष उमेदवार राजश्री अहिराव यांना पक्षाचा एबी फॉर्म दिला होता.त्यामुळे महायुतीत बंडाळी असे चित्र दिसून आले.परंतु वरिष्ठ स्तरावर झालेल्या राजकीय चर्चेनंतर शिवसेना शिंदे गटाने राजश्री अहिराव यांच्या ऐवजी विद्यमान आमदार तसेच महायुतीच्या अधिकृत उमेदवार सरोज अहिरे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी प्रसिद्धी माध्यमांसाठी पत्रक काढून पाठिंबा जाहीर केला आहे.
नांदूर मानूर परिसरात विवाह समारंभासाठी एकमेव सुसज्ज संजीवनी ए.सी. बँक्वेट मंगल कार्यालय