485 Post Views
नाशिकरोड : उमेश देशमुख
दिंडोरी विधानसभा मतदारसंघात यावेळेस परिवर्तन अटळ दिसते. तालुक्यातील कष्टकरी जनता, शेतकरी, कामगार आणि उपेक्षित घटक त्रस्त आहेत. त्यांनी एकच निर्धार व्यक्त केलेला दिसतोय, तो म्हणजे परिवर्तनाचा, यासाठी मतदार महाविकास आघाडीचे उमेदवार सुनीता चारोस्कर यांना बहुमताने महाराष्ट्राच्या विधानसभेत दिंडोरीचे प्रतिनिधित्व करण्यासाठी पाठविणार आहेत. त्यामुळे यावेळेस दिंडोरी मध्ये परिवर्तन अटळ आहे. असा विश्वास तालुक्यातील प्रगतशील शेतकरी प्रकाश शिवाजी माळोदे यांनी व्यक्त केला आहे
दिंडोरी विधानसभा मतदारसंघात या वेळेला प्रचंड चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. लढतीमध्ये सामान्य जनता महाविकास आघाडीच्या उमेदवार सुनीता चारोस्कर यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे. त्यांना विजयी केल्याशिवाय जनता स्वस्थ बसणार नाही. दिंडोरी तालुक्यातील मतदारांनी एक वर्षापूर्वीच मतदार संघात बदल घडवून आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला बहुसंख्य मतदारांचा पाठिंबा मिळतो आहे. २३ नोव्हेंबर रोजी निवडणुकीचा निकाल आहे. मतमोजणीत दिंडोरी विधानसभा मतदारसंघांमध्ये सुनिता चारोस्कर शंभर टक्के विजय होणार,यात शंका नाही. विद्यमान आमदारांनी सत्तेत असताना दिंडोरी तालुक्यातील ठराविक भागाचा विकास केला. सर्वांगीण विकास करणे त्यांच्याकडून अपेक्षित होते. मात्र तसे घडले नाही. त्यामुळे जनतेत प्रचंड नाराजीचा सूर आहे. त्याचा परिणाम म्हणून निवडणुकीमध्ये जनता त्यांना यावेळेस निश्चितपणे घरी बसवतील,असे चित्र दिसून येते आहे.
नांदूर मानूर परिसरात विवाह समारंभासाठी एकमेव सुसज्ज संजीवनी ए.सी.बँक्वेट मंगल कार्यालय