780 Post Views
नाशिकरोड : उमेश देशमुख
देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सरोज अहिरे यांनी शिंदे गावात अठरा कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर केली. त्याचप्रमाणे पस्तीस कोटींचा शासकीय दवाखाना देखील मंजूर केला. दोनी कामे शिंदे गावातील नागरिकांसाठी अतिशय महत्त्वाची होती. त्यामुळे आमदार अहिरे या आमच्यासाठी खरोखरच विकास कन्या आहेत. अशी प्रतिक्रिया माजी सरपंच बाळासाहेब निवृत्ती तुंगार यांनी दिली.
शिंदे गावातील महिला आणि तरुणींना गावातील पाणीटंचाई कशी असते, हे सांगण्याची गरज नाही. त्यांनी स्वतः त अनुभव घेतलेला आहे. गावाजवळच दारणा नदी आणि चेहडी पंपिंग स्टेशन आहे. असे असतानाही गावाला थेट पंपिंग स्टेशन मधून पाणीपुरवठा केला जात नव्हता, अनेक दिवसांपासून शिंदे गावाला चेहडी पंपिंग स्टेशन मधून पाणीपुरवठा व्हावा, अशी मागणी केली जात होती. परंतु आजवरच्या नेत्यांनी केवळ आश्वासने दिली, त्याची पूर्तता केली नाही. सरतेशेवटी विद्यमान आमदार सरोज अहिरे यांच्या सहकार्याने पाणीपुरवठा योजना मंजूर झाली. शिंदे गावाच्या गावासाठी ह अतिशय अभिमानास्पद काम होते. अनेक वर्ष रेंगाळलेले, रखडलेले काम अहिरे यांनीच पूर्ण करून दाखविले. त्यामुळे त्यांचे कौतुक केले तर त्यात वावगे काय?,असा प्रश्न माजी सरपंच बाळासाहेब तुंगार यांनी उपस्थित केला. तसेच शिंदे गावाला पस्तीस कोटींचा शासकीय दवाखाना आमदार अहिरे यांनी मंजूर केला. दोन अतिशय महत्त्वाची कामे केल्याने आमच्या दृष्टीने आमदार अहिरे या विकास कन्याच राहतील की नाही?, अशी ठाम भूमिका माजी सरपंच तुंगार यांनी घेतली.
नांदूर मानूर परिसरात विवाह समारंभासाठी एकमेव सुसज्ज संजीवनी ए.सी. बँक्वेट मंगल कार्यालय