550 Post Views
सिन्नर : प्रतिनिधी
सिन्नर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार उदय सांगळे यांच्या सिन्नर शहरातील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन सोमवारी ( दि.११ ) सकाळी खासदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते झाले. सांगळे यांचे प्रामाणिकपणे काम करून त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणावे, असे आवाहन खासदार वाजे यांनी केले.
याप्रसंगी भारत कोकाटे,संजय सोनावणे, किरण डगळे, गोविंद लोखंडे, नामदेव कोतवाल,दत्ता वाईचळे, मंगला गोसावी, म्युजिद खतीफ,जालिंदर थोरात,बापू थोरात,सुनील चकोर,गणेश घोलप,रुपेश मुठे आदी मान्यवर उपस्थित होते.
खासदार वाजे पुढे म्हणाले की, प्रत्येक कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम करायला हवे, प्रामाणिक काम केले तर त्याचा त्याचे फळ उत्तम मिळते. महाविकास आघाडीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने उमेदवार उदय सांगळे यांना निवडून आणण्यासाठी कठोर परिश्रम घेण्याची आवश्यकता आहे. मतदार संघातील प्रत्येक गावागावात,घराघरात जाऊन सांगळे यांचा प्रचार करावा. तरुण व तडफदार नेतृत्व असल्यामुळे मतदार संघाला सांगळे यांच्या नेतृत्वाचा निश्चितपणे लाभ होईल, असे खासदार वाजे यांनी म्हटले.
नांदूर मानूर परिसरात विवाह समारंभासाठी एकमेव सुसज्ज संजीवनी ए.सी. बँकेत मंगल कार्यालय