23.6 C
Nashik
Saturday, July 5, 2025
spot_img

तेंव्हा तुमच्या विरोधात उभा होतो, पण आता सोबत !; तुम्ही शंभर टक्के निवडूण येणार असल्याचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांचा आमदार ढिकले यांना शब्द

601 Post Views

नाशिकरोड : उमेश देशमुख

नाशिक पूर्व विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार आमदार अँड राहुल ढिकले यांच्या विरोधात मी मागील निवडणुकीत उभा होतो. यावेळेला त्यांच्या बाजूने आहे. त्यांना मी शब्द दिलाय,पैसा सर्वस्व नसतो, यंदाची निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी असून तुम्हाला पुन्हा एकदा प्रचंड मतांनी निवडून आणून दाखविणार आहे. त्यासाठी मला कोणताही त्याग करावा लागला तरी चालेल,असे प्रतिपादन माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी केले.

नाशिक पूर्व विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार आमदार अँड राहुल ढिकले यांच्या नाशिकरोड येथील संपर्क कार्यालयाचे उद्घाटन शनिवारी ( दि.९ ) सायंकाळी शकुंतला करावा यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी माजी आमदार बाळासाहेब सानप, अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, शिवसेना शिंदे गटाचे उपनेते विजय करंजकर, आरपीआय आठवले गट, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कवाडे सर गटाचे शशिकांत उन्हवणे, निवृत्ती अरींगळे यांची प्रमुख उपस्थिती होती.माजी आमदार सानप पुढे म्हणाले की, राजकारणात आपल्याला कुठे थांबावे अन कुठे लढावे, याची समज असावी लागते. हल्ली त्याऐवजी पैसा हाच निकष लावला जात असल्याची खंत सानप यांनी बोलून दाखवली. महायुतीचे उमेदवार ढिकले यांनी पैसाच सर्वस्व असते तर पंतप्रधान मोदी ऐवजी टाटा आणि अंबानी देशाचे पंतप्रधान असते. असे म्हटले.सूत्रसंचालन राजेश आढाव यांनी केले. आभार विक्रम कदम यांनी मानले.

यावेळी माजी नगरसेवक रमेश धोंगडे, माजी शिक्षण मंडळ सभापती संगीता गायकवाड, माजी शिक्षण मंडळ सदस्य बाबुराव ( विनायक )आढाव, माजी नगरसेवक दिनकर आढाव, माजी नाशिकरोड मंडळ अध्यक्ष  हेमंत गायकवाड, सुनील आडके, अशोक तापडिया,मनोहर कोरडे, गणेश कदम, प्रताप मेहालोरिया, शशिकांत उन्हवणे, अमोल पगारे, भरत निकम, संभाजी मोरुस्कर, शिवाजी भोर, संजय भालेराव, सचिन हांडगे नाशिकरोड मंडळ अध्यक्ष शांताराम घंटे, नितीन चीडे आदी उपस्थित होते.

सानप यांचे भाषण गाजले : आमदार ढिकले

आमदार अँड राहुल ढिकले यांनी माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्या त्यागाचे कौतुक केले. त्यांचे पंचवटी मधील भाषण सर्वांना आरसा दाखविणारे ठरले. दोन दिवस झाले पण अजूनही त्यांच्या भाषणाची चर्चा आजही सुरू आहे.

द्वारका ते दत्त मंदिर उड्डाणपूलास प्राधान्य

आमदार अँड ढिकले यांनी मतदारांनी संधी दिली तर द्वारका ते दत्त मंदिर यादरम्यान उड्डाणपुलाचे रखडलेले काम सुरू करण्यास प्राधान्य देईल. वाढती रहदारी विकासाला अडसर निर्माण होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles