23.6 C
Nashik
Saturday, July 5, 2025
spot_img

आमदार राहुल ढिकले यांच्या उमेदवारी अर्जासाठी सोमवारचा मुहूर्त; काळाराम मंदिरापासून मिरवणुकीने अर्ज दाखल करणार

381 Post Views

नाशिकरोड : उमेश देशमुख

नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार राहुल ढिकले सोमवारी ( दि.२८ ) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. काळारामाचे दर्शन घेऊन मंदिरापासून मिरवणुकीला सुरुवात होईल. यानंतर निवडणूक कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. याप्रसंगी महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे.

नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये मुख्य लढत आहे. महाविकास आघाडी मधील जागा वाटपाचा गोंधळात गोंधळ सुरू आहे. तर दुसरीकडे भारतीय जनता पार्टीने आमदार राहुल ढिकले यांना उमेदवारी जाहीर करून आघाडी घेतली. आमदार ढिकले यांनी यापूर्वीच मतदार संघात प्रचाराचा दौरा पूर्ण केलेला आहे. उमेदवारी जाहीर झाल्यापासून ढिकले पुन्हा एकदा जोमाने प्रचाराला लागलेले दिसतात.ढिकले यांच्या उमेदवारीमुळे भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गट, पीपल्स रिपब्लिकन कवाडे सर गट, आरपीआय  आठवले गट या मित्र पक्षात उत्साहाचे वातावरण दिसते.

नांदूर नाका परिसरात विवाह सोहळ्यासाठी एकमेव सुसज्ज संजीवनी बँक्वेट हॉल

आमदार ढिकले म्हणतात…

भारतीय जनता पार्टीने आपल्याला दुसऱ्यांदा उमेदवारी जाहीर केली. पक्षश्रेष्ठींनी दाखवलेला विश्वास सार्थ करुन दाखवील. मतदारसंघात केलेली विकास कामे, नागरिकांचा जनसंपर्क आणि पक्षाने वेळोवेळी दिलेली जबाबदारी योग्य रीतीने पूर्ण केली. तसेच भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मित्र पक्ष असलेले शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गट, आरपीआय आठवले गट यांचे मनपूर्वक आभार मानतो. नाशिक पूर्वचे मतदार मला माझ्या कामाची पावती म्हणून पुन्हा एकदा संधी देऊन विधानसभेत पाठवतील याविषयी खात्री आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles