911 Post Views
नाशिकरोड : उमेश देशमुख
नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे आमदार ॲड. राहुल ढिकले यांनी जेलरोड येथील ज्येष्ठ नागरिकांसाठी रविवारी ( दि. ७ ) सकाळी श्री हरी लॉन्स येथे मिसळ पार्टीची मेजवानी दिली. त्याचप्रमाणे त्यांना मोफत छत्रीचे वाटप करीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली. याप्रसंगी जेष्ठ नागरिकांची उपस्थिती नजरेत भरणारी ठरली.
नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघामध्ये मागील दोन पंचवार्षिक निवडणुकीत सलग दोनवेळा भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून आले. यावेळेलाही भाजप विजय मिळवून हॅट्रिक करणार, असा निर्धार भाजप पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार ॲड. राहुल ढिकले यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. त्यादृष्टीने त्यांनी प्रचाराची रणशिंग फुंकले आहे. शिवसेना शिंदे गटाचे नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष बाबुराव ( विनायक ) आढाव यांच्या श्रीहरी लॉन्स येथे आमदार ढिकले सर्थकांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी मिसळ पार्टीचे आणि मोफत छत्रीचे वाटप केले.
याप्रसंगी भाजपचे ज्येष्ठ नेते विजय साने, माजी नगरसेवक संभाजी मोरुसकर, माजी नगरसेवक दिनकर आढाव, शहर सरचिटणीस राजेश आढाव, नाशिकरोड मंडळ अध्यक्ष शांताराम घंटे, सचिन हांडगे, राहुल कोथामिरे,संतोष क्षीरसागर, योगेश कपिले,कन्हैया साळवे, अंबादास पगारे आदी.उपस्थित होते.याप्रंसगी विजय साने यांनी आ.राहुल ढिकले यांच्या कामाचे कौतुक केले. भाजपच देशाला प्रगतीच्या मार्गावर नेऊ शकतो आणि नरेंद्र मोदी हेच देशाला सक्षम नेतृत्व देऊ शकतात असे प्रतिपादन केले.भाजपच कार्यकर्ता कायम जनतेच्या सेवेसाठी तत्पर असल्याचे साने यांनी म्हटले.
ज्येष्ठांची आमदारांसोबत सेल्फी
कार्यक्रम आटोपल्यानंतर उपस्थित जेष्ठ नागरिकांनी आमदार ऍड. राहुल ढिकले यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी इच्छा व्यक्त केली. आमदारांनी देखील जेष्ठ नागरिकांच्या सोबत सेल्फी काढण्यास उत्साह दर्शवत प्रतिसाद दिला. ज्येष्ठ नागरिक अन् आमदार राहुल ढिकले यांची सेल्फी चर्चेचा विषय झाला.