28.1 C
Nashik
Thursday, March 26, 2026
spot_img

पेट्रोलपंप चालकांकडून पेट्रोलची कृत्रिम टंचाई ! ; काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी

343 Post Views

 

नाशिकरोड : उमेश देशमुख

नाशिक शहरातील काही ठराविक पेट्रोलपंप चालकांकडून पेट्रोलची कृत्रिम टंचाई करण्यात येत आहे. ठराविक लिटरच पेट्रोल आणि डिझेल मिळेल, मागणी प्रमाणे मिळणार नाही, सर्वांना मिळाले पाहिजे, आता पेट्रोल पुरवठा कमी मिळतो असे एक ना अनेक कारणे पुढे करून कृत्रिम पेट्रोल टंचाई निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची चर्चा सद्या शहरात होताना दिसते.आपल्याला पेट्रोल मिळणार नाही या भीतीमुळे पेट्रोल पंपावर वाहनधारकांमधून रांगा लावल्या जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.

नाशिक – पुणे रोड, छत्रपती संभाजी नगर रोड, नाशिक – धुळे महामार्ग तसेच शहरातील नाशिकरोड, शिंदे, पळसे,नांदूर नाका,आडगाव आदी भागात प्रामुख्याने कृत्रिम पेट्रोल टंचाई केली जात असल्याचे बोलले जाते आहे. जिल्हा प्रशासन आणि पुरवठा विभागाने याकडे तातडीने लक्ष पुरवून कृत्रिम टंचाई करणाऱ्या पेट्रोलपंप चालकांवर कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

पुरवठा सुरळीत होतोय

जिल्ह्यात नियमित पणे पेट्रोल व डिझेल पुरवठा होतो आहे. कोणत्याही प्रकारे पुरवठा कमी होत नाही.परंतु अचानक पणे पेट्रोल पंपावर वाहनधारकांकडून अधिक पेट्रोल ,डिझेल भरण्याची मागणी वाढली. वाहनधारकांमध्ये पेट्रोलची टंचाई होईल अशी भीती निर्माण होताना दिसते. त्याचा परीनं म्हणून पेट्रोल पंपावर मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे चित्र दिसतेपेट्रोल पुरवठा नियमित होतोय मुबलक प्रमाणात पेट्रोल आहे. वाहनधारकांनी भीती बाळगू नये. देशात किमान तीन महिने पुरेल इतका पेट्रोल साठा असून गैरसमज करून विनाकारण अधिकचा साठ घेऊ नये.असे आवाहन नाशिक पेट्रोल डीलर असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष मुकुंद आढाव यांनी केले आहे.

 

तर जीवनावश्यक वस्तू कायद्या अंतर्गत गुन्हा

पेट्रोलचा काळाबाजार म्हणजे पेट्रोल किंवा डिझेलचा अवैध साठा करून, कृत्रिम टंचाई निर्माण करणे आणि त्यानंतर ते निर्धारित दरापेक्षा जास्त किमतीत चोरून विक्री केली जात असेल तर हे बेकायदेशीर कृत्य मानले जाते. जीवनावश्यक वस्तू कायदा, १९५५ अंतर्गत हा एक गंभीर गुन्हा आहे, ज्यावर सरकार कारवाई करू शकते.

असा होतो पेट्रोलचा काळाबाजार

कृत्रिम टंचाई: पेट्रोलपंप चालक किंवा काळेबाजार करणारे इंधनाचा मुबलक साठा असूनही ‘नो स्टॉक’ चे फलक लावणे.
सामान्य नागरिकांना पेट्रोल न मिळता, तेच पेट्रोल अव्वाच्या सव्वा दराने चोरट्या मार्गाने विक्री करणे.
अवैध साठवणूक: परवानगी नसताना घरामध्ये किंवा इतर ठिकाणी धोकादायक पद्धतीने पेट्रोल साठवणे.

नागरिकांनी माहिती द्यावी

शहरात एखाद्या पेट्रोल पंप चालकाकडून पेट्रोल संपणार आहे. अशी अफवा पसरवून कृत्रिम पेट्रोल टंचाई आणि वाह.वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होत असेल, त्यामुळे पंपावर गर्दी होऊन साठेबाजीचा प्रकार होत असेल तर नागरिकांनी अशा साठेबाजीची माहिती स्थानिक प्रशासनाला तातडीने द्यावी असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles