442 Post Views
नाशिकरोड : उमेश देशमुख
प्रभाग २ मधील भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार रिद्धीश निमसे निवडणूक रिंगणात आहे. त्यांना वडील उद्धव निमसे यांनी त्यांच्या कार्यकाळात राबविलेल्या विकासकामांची साथ अन् मार्गदर्शन लागलेले आहे. स्थानिक नागरिकांसह भाजपच्या नेतेमंडळींचे देखील पाठबळ आहे. त्यामुळे रिद्धीश निमसे यांना नांदूर मानुर तसेच परिसरातून निर्णायक आघाडी मिळवून देण्यासाठी ग्रामस्थ निश्चितपणे पुढाकार घेतील असा दावा नांदूर मानुर विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन संतोष माळोदे यांनी नाशिक बातमीदार न्यूज चॅनेल सोबत बोलतांना व्यक्त केला.
याविषयी अधिक माहिती देताना माजी चेअरमन संतोष माळोदे यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली. त्यांच्या मते भाजपचे अधिकृत उमेदवार रिद्धीश निमसे
मूळचे नांदूर मानुर चे स्थानिक रहिवासी आहेत. त्यांचे नातेगोते प्रभागात महत्वाच्या असलेल्या आडगाव आणि परिसरात विखुरलेले आहे. त्यामुळे त्यांना चिंता करण्याची अजिबात आवश्यकात नाही. शिवाय रिद्धीश निमसे याचे वडील उद्धव बाबा निमसे मागील वीस ते पंचवीस वर्षापासून सार्वजनिक जीवनात सक्रीय सहभागी आहे. त्यांनी आजवर प्रभागात विकासकामे उभारलेली आहे. मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला. त्यांनी तळागाळातील प्रत्येक घटकासाठी केलेले कार्य हीच खरी तर रिद्धीश निमसे यांची जमेची बाजू मानली जात आहे. त्यामुळे त्यांना नांदूर मानुर येथील ग्रामस्थ निश्चितपणे पुढाकार घेऊन निर्णय आघाडी देतील, असा पुनरुच्चार माजी चेअरमन संतोष माळोदे यांनी व्यक्त केला.
मतदार नक्कीच जाणीव ठेवणार !उद्धव
निमसे यांनी प्रभागात मी विशेष करुन नांदूर मानुर परिसरात भरीव योगदान दिले. प्रामुख्याने येथील शेतकरी वर्गाच्या हितासाठी स्वपक्षाच्या विरोधात देखील भूमिका घेण्यास उध्दव बाबा यांनी मागेपुढे बघितले नाही. स्थानिक नागरिक, शेतकरी आणि कष्टकरी जनतेच्या मागे सतत उभा राहिलेला नेता म्हणून उद्धव निमसे परिचित आहे. त्यांच्या योगदानाचा, नावलौकिकाचा लाभ निश्चितपणे भाजपचे अधिकृत उमेदवार रिद्धीश निमसे यांना होईल. असे माजी चेअरमन संतोष माळोदे यांनी म्हटले.




