19.1 C
Nashik
Thursday, February 5, 2026
spot_img

जनतेचा विश्वास, कार्यकर्त्यांची साथ आणि सामाजिक बांधिलकी हेच आपल्या राजकारणाचे बळ ! ; राष्ट्रवादीचे उमेदवार अतुल मते यांचा दावा

283 Post Views

नाशिकरोड : उमेश देशमुख

प्रभाग २ मधून सर्वसामान्य खुला प्रवर्गातून अजित दादा पवार आणि शिवसेना शिंदे गटाच्या युतीतर्फे अतुल शंकरराव मते निवडणूक रिंगणात आहे. श्रीफळ वाढवत प्रचाराचा श्रीगणेशा नंतर त्यांनी प्रभाग पिंजून काढण्याचा निश्चय व्यक्त केला. घरोघरी जाऊन प्रचार करण्यावर त्यांचा कल दिसतो. प्रचारा दरम्यान त्यांना मिळत असणाऱ्या प्रतिसादामुळे त्यांच्या भावना उंचावलेल्या दिसतात.जनतेचा विश्वास, कार्यकर्त्यांची साथ आणि सामाजिक बांधिलकी हेच आपल्या राजकारणाचे बळ असल्याचा दावा राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार अतुल मते यांनी नाशिक बातमीदार न्यूज चॅनेल सोबत बोलतांना व्यक्त केला.

सर्वसामान्य कुटुंबातून पुढे येत जनतेच्या विश्वासावर आपले नेतृत्व उभे करणारे अतुल मते यांनी प्रभागातील कार्यकर्ते, मित्रपरिवार व नागरिकांसोबत गेल्या काही दिवसांपासून आपुलकीची नाळ जोडलेली दिसते. त्यामुळे कमी वेळेत त्यांनी जनतेच्या मदतीला धावणारा सामान्य कार्यकर्ता अशी लोकप्रियता निर्माण केली आहे. कोणताही राजकीय वारसा नसताना केवळ मेहनत, चिकाटी आणि सामान्य माणसाशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्याच्या बळावर अतुल मते यांनी आपली ओळख निर्माण केली.

एक सामान्य कार्यकर्ता म्हणून त्यांनी सामाजिक जबाबदारी आणि कर्तव्य आजवर चोखपणे निभावले.आडगाव व परिसर, मळे वसाहत,कोणार्क नगर आदी भागातील नागरिकांसोबत त्यांचा दांडगा जनसंपर्क दिसतो.या भागातील सर्वसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले. लोकहिताचे उपक्रम राबवले. त्यामुळेच आजही कार्यकर्ते आणि नागरिकांच्या मनात त्यांच्याविषयी आदराची भावना कायम आहे. नेहमी आमच्यासोबत उभे राहणारे, सुख-दुःखात धावून येणारे नेतृत्व” अशी भावना प्रभाग २ मधील नागरिक व्यक्त करताना दिसतात.

मदतीला धावणारा कार्यकर्ता

आपल्या सभोवतालच्या लोकांच्या समस्या समजून घेऊन, त्यांना मदत करण्यासाठी तत्पर असलेला,कोणताही स्वार्थ न पाहता सामाजिक कार्यामध्ये झोकून देणारा कार्यकर्ता म्हणून अलीकडच्या काळात अतुल मते यांनी  आपली ओळख निर्माण केली आहे. समाजासाठी भरीव योगदान देणारा कार्यकर्ता असा त्यांच्या समर्थकांचा दावा आहे. महापालिका निवडणुकीत अतुल मते यांच्या कार्याची दखल प्रभागातील जनता जनार्दन निश्चित घेतील असा आत्मविश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांना वाटतो आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles