नाशिक मराठी पत्रकार संघातर्फे दरवर्षी पत्रकार दिनाचे औचित्य साधून दिनांक ६ जानेवारी रोजी प्रसिद्धी माध्यमे आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना कार्यगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत. यावर्षी देखील पुरस्कार्थींची घोषणा केली आहे. यामध्ये मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे शिक्षणाधिकारी नितीन जाधव, सकाळचे रावसाहेब उगले, श्रीहरी मंगल कार्यालयाचे संचालक युवा उद्योजक प्रसाद बाबुराव आढाव यांच्यासह ४३ पुरस्कार्थींचा समावेश आहे.
नांदूर नाका परिसरातील प्रसिद्ध संजीवनी मंगल कार्यालयाचे संचालक तथा नांदूर मानुर विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन संतोष माळोदे, प्रसिद्ध युवा बांधकाम व्यावसायिक करण हेमंत गायकवाड यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा मंगळवारी ( दि.६ ) सकाळी अकरा वाजता देवळाली कॅम्प येथील सुभाष गुजर शाळेत पार पडणार आहे.
पत्रकार दिनानिमित देण्यात येणाऱ्या नाशिक मराठी पत्रकार संघाचे कार्यगौरव पुरस्कार घोषित झाले असून यात प्रिंट मिडियाचे-१३, इलेक्ट्रॉनिक मिडिया-२, वृत्तपत्र विक्रेते-२, क्रिडा-४, उद्योजक-३ धार्मिक-२, शैक्षणिक-७, कृषि-३, सांस्कृतिक-३, सामाजिक-२, शौर्य-१, सहकार-२, अशा ४३ लोकांना मंगळवार दि.६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता डॉ. गुजर सुभाष हायस्कुल, देवळाली कॅम्प, नाशिक येथे पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष सुनिल पवार, कार्याध्यक्ष अरूण बिडवे सरचिटणीस अरूण तुपे यांनी दिली.तालुका पत्रकार संघाची बैठक सुनिल पवार यांचे अध्यक्षतेखाली व संस्थापक अध्यक्ष मोतीराम पिंगळे, माजी अध्यक्ष सुधाकर गोडसे व नरेंद्र पाटील यांचे उपस्थित होऊन पुरस्कार्थीची निवड करण्यात आली.
जाहीर पुरस्कार्थींची नावे
पवन बोरस्ते (पुढारी),भारत पगारे (देशदूत), मुंकुद बाविस्कर (गांवकरी), रावसाहेब उगले (सकाळ) गणपत पाटील (लोकमत) नरेंद्र देसले (पुण्यनगरी), तुषार महाले (दिव्यमराठी), संपतराव थेटे (महाराष्ट्र टाइम्स), सुधिर कुलकर्णी (भ्रमर), सुशांत किरवे (आपलं महानगर), दिलीप सांळुके (नवराष्ट्र) रविंद्र पाटील (बाळकडू), सतिष निकुंभ (दैनिक भास्कर), इलेक्ट्रॉनिक मिडिया: सचिन आव्हाड (उत्तर महाराष्ट्र न्युज), तेजस हिरण (जागर जनस्थान), वृत्तपत्र विक्रेते – सुकदेव जाधव (देवळाली कॅम्प), तुषार भोर(दरी मातोरी), क्रिडा– सर्वेश झुटे, तनिष्क कनोजिया, रेहान खान, समिक्षा अष्टेकर, उद्योजक– शंकरराव पिंगळे, बाळासाहेब तुंगार, प्रसाद आढाव, धार्मिक –ह.भ.प. राहुल महाराज गायकवाड, गजानन महाराज भजनी मंडळ भगूर, शैक्षणिक – सागर बोडके, वैष्णवी कंक, मयुरेश आढाव,शिक्षणधिकारी नितीन जाधव, संज्योत कैलास गायधनी, कांतीलाल सोनवणे, निर्मल करियर अकादमी शिंदे, कृषि– बबनराव मानकर, चाडेगांव, उज्वल शेतकरी बचत गट पळसे, सांस्कृतिक – रमेश वाघमारे, नारोड, नाशिक कवी परिवार, मदन केदारे, ना.रोड. सामाजिक – ज्ञानेश्वर माळोदे, शंकरराव ढिकले, शौर्य– श्रीमती गंगुबाई आंनदा गोडसे, दिपाली दाभणे, नाशिक, सहकार – जय झूलेलाल नागरी सह पतसंस्था, ना.रोड यांचा समावेश आहे. सदरचे पुरस्कार वितरण सोहळा, डॉ. गुजर सुभाष हायस्कुल, देवळाली कॅम्प, येथे ६ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजता विविध मान्यवरांच्या उपस्थितीत गौरवचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव केला जाणार आहे.
या कार्यक्रमास पत्रकार व नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन उपाध्यक्ष प्रमोद आडके, दिपक कणसे,खजिनदार वसंत कहांडळ,सहखजिनदार संजय निकम,प्रकाश उखाडे, संतोष भावसार,सुभाष कांडेकर,नंदकुमार शेळके,उमेश देशमुख संदिप नवसे,भास्कर सोनवणे, तुषार बिडवे, नथुजी ढिकले,गणपत पाटील, योगेश सगर,अक्षय पेखळे, बाळू शिंदेआदीसह सदस्यांनी केले आहे.