19.1 C
Nashik
Thursday, February 5, 2026
spot_img

प्रभाग २० मध्ये काटे की टक्कर ! माजी नगरसेवक संभाजी मोरुस्कर, हेमंत गायकवाड आणि कैलास मुदलियार यांच्यात ठरणार लक्षवेधी लढत !

405 Post Views

 

नाशिकरोड : उमेश देशमुख

१५ जानेवारी रोजी होऊ घातलेल्या नाशिक महानगर पालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत यावेळेला नाशिकरोड प्रभागातील काही मोजक्या प्रभागात काटे की टक्कर अपेक्षित असल्याचे मानले जाते. यापैकी प्रभाग २० मध्ये पुरुष सर्वसाधारण प्रवर्गात लक्षवेधक लढत अपेक्षित दिसते. सुरुवातीला माजी नगरसेवक संभाजी मोरुस्कर आणि हेमंत गायकवाड यांच्यात समोरासमोर लढत होईल असे वाटत होते.परंतु अचानकपणे सामजिक कार्यकर्ते कैलास मुदलियार यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करीत उमेदवारीसाठी दावा ठोकला. परिणामी या प्रभागात आता चुरशीची तिरंगी लढत अपेक्षित आहे.

प्रभाग २० मधील सर्वसाधारण पुरुष प्रवर्गातील निवडणूक यंदा सर्वांचेच लक्ष वेधून घेणारी ठरणार अशी शक्यता आहे. एकापेक्षा एक मातब्बर येथे एकमेकांच्या समोरासमोर उभे राहणार आहेत. माजी नगरसेवक संभाजी मोरुस्कर ज्येष्ठ नगरसेवक आहे. नाशिकरोड मधील भाजपचे जुने जानते नगरसेवक म्हणून त्यांची ख्याती आहे. निवडणून येणाऱ्या भाजपच्या हमखास उमेदवारांपैकी ते एक असतात. त्यांचा विजय भाजपचे पदाधिकारी जवळपास गृहीत धरत असतात. भाजपच्या बाजूने वातावरण असोत अथवा विरोधात मोरुस्कर यांचा विजय निश्चित मानला जात होता. दांडगा जनसंपर्क, प्रभागातील विकासकामे प्रभागातील जनतेसोबत त्यांची जुळलेली नाळ ही त्यांची जमेची बाजू वाटते. त्यामुळे यंदाही संभाजी मोरस्करच विजयी होतील असा विश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांना वाटणे स्वाभाविक आहे.

परंतु यावेळेला मोरुस्कर यांना प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक आणि नाशिकरोड व्यापारी बँकेचे माजी संचालक हेमंत गायकवाड यांच्याकडून कडवे आव्हान मिळू शकते. माजी नगरसेविका संगीता गायकवाड या हेमंत गायकवाड यांच्या पत्नी आहे. मागील पंचवार्षिक निवडणुक त्यांनी प्रभाग २० मधून लढविलेली होती. त्यामुळे त्या प्रभागातील मतदारांसोबत संपर्कात आहे. त्यांचाही प्रभागात विकासकामे आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात हातभार आहे. शिखर स्वामींनी या मंडळाच्या नावाने त्यांचा महिलांसोबत सतत संपर्क असतो. हेमंत गायकवाड आणि संगीता गायकवाड या दांपत्याचा प्रभागात मुबलक जनसंपर्क आणि घरोब्याचे हितसंबंध आहे. त्यामुळे हेमंत गायकवाड उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून विजयाचे प्रबळ दावेदार मानले जातात.

येथील सामाजिक कार्यकर्ते आणि बालाजी मित्र मंडळाचे अध्यक्ष कैलास मुदलियार यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करून उमेदवारीसाठी दावा ठोकला आहे. त्यांच्या प्रवेशामुळे निवडणुकीत चुरस निर्माण झालेली आहे. गायकवाड आणि मोरुस्कर यांच्यात वाटणाऱ्या दुरंगी लढतीत मुदलियार यांनी एकप्रकारे आडकाठी निर्माण केलेली दिसते. प्रभागात त्यांनी उभारलेले तिरुपती येथील प्रति बालाजी मंदिर त्यांची मोठी जमेची बाजू मानली जाते. यानिमित्ताने प्रभागातच नव्हे तर संपूर्ण नाशिक परिसरात ते चर्चेत आले आहे. मंदिराप्रती त्यांची असलेली आस्था आणि दरवर्षी रेजिमेंटल प्लाझा येथे आयोजित केली जाणारी गणेश उत्सवाची अबाधित ठेवलेली परंपरा बघुन सामान्य जनतेत त्यांची प्रतिमा उजळून धार्मिक सोपासकर जपणारा कार्यकर्ता अशी बनलेली दिसते. मंदिराच्या माध्यमातून ते आणि त्यांचे कुटुंब सामान्य जनतेच्या सतत संपर्कात असतात. यानिमित्ताने त्यांचा प्रभागात जनसंपर्क आणि नावलौकिक वाढलेला दिसतो.तसेच तरुण कार्यकर्त्यांचा फौजफाटा त्यांच्या पाठीमागे आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीत त्यांचे बंधु गिरीश मुदलियार यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढविलेली आहे. त्यांना मिळालेली मते दखल घेण्यासारखी आहे. त्यामुळे संभाजी मोरुस्कर, हेमंत गायकवाड यांना तगडे आव्हान कैलास मुदलियार देऊ शकतात. अशी चर्चा प्रभागात केली जात आहे. भाजप, उध्दव ठाकरे शिवसेना आणि शिवसेना शिंदे गट अशी तिरंगी लढत मुदलियार यांच्या प्रवेशामुळे निर्माण झालेली दिसते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles