546 Post Views
नाशिकरोड : उमेश देशमुख
मागील पाच वर्षाच्या कार्यकाळात मतदारांना अपेक्षित कामकाज केले. प्रभागातील समस्या सोडविण्यासाठी भर दिला. विकासकामे राबविताना आपण प्रभागातील सामान्य नागरिक केंद्रबिंदू म्हणून समोर ठेवला.पक्षाच्या वरिष्ठ नेते आणि पदाधिकारी यांच्या सहकाऱ्याने प्रभागात जास्तीजास्त कामे केली. त्याचप्रमाणे मतदारांसोबत सतत संपर्क साधून होतो. त्यामुळे येथील जनता जनार्दन मला पुन्हा एकदा नगरसेवक म्हणून निवडून देतील. असा आत्मविश्वास माजी नगरसेवक शरद मोरे ( सर )यांनी नाशिक बातमीदार न्यूज चॅनेल सोबत बोलतांना व्यक्त केला.
जेलरोड परिसरातील प्रभाग १८ मधील अनुसूचित जाती प्रवर्गातून शरद मोरे ( सर ) दुसऱ्यांदा निवडणूक लढविण्यास इच्छुक आहे. याविषयी त्यांच्यासोबत बातचीत केली असता त्यांनी प्रभागात केलेल्या विकासकामांचा पाढाच वाचला. त्यांच्या मते २०१७ मध्ये झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत जनतेने मला निवडून देऊन माझ्यावर मोठा विश्वास ठेवला. त्या विश्वासाला तडा जाऊ नये यासाठी मी कायम त्यांच्या संपर्कात होतो. त्यांना भेडसावणाऱ्या अडीअडचणी सोडविण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे. त्याचाच परिपाक म्हणून आजही प्रभागातील जनता पुन्हा एकदा माझ्या पाठीमागे ठामपणे उभी राहणार असा मला विश्वास वाटतो. नगरसेवक हे पद जनतेच्या सेवेसाठी असते. त्याचा सदुपयोग करणे प्रत्येक नगरसेवकाच्या हातात असते. मी देखील तेच केले. जनतेने सुचविलेले कामे वेळीच मार्गी लावली त्यांना निराश केले नाही. काम होत नसेल तर ते का होऊ शकत नाही. याविषयी समाधानपूर्वक माहिती संबंधित नागरिकांना देत होतो. जनतेच्या कामांचा अधिकाऱ्यांकडे सतत पाठपुरावा करून कामे होत नाही तोपर्यंत शांत बसलेलो नाही. जनतेचे समाधान होत नाही तोपर्यंत अधिकाऱ्यांचा पिछा सोडलेला नाही.२०२५ मधील पंचवार्षिक निवडणुकीत मी पुन्हा एकदा निवडणूक लढविण्यास सज्ज आहे. येथील मतदार मला पुन्हा एकदा नक्कीच संधी देतील. याविषयी मला शंभर टक्के खात्री वाटते.
पक्षासोबत निष्ठावंत असल्याने उमेदवारी !
२०१२ पासून मी भारतीय जनता पक्षाचा सदस्य म्हणून कामकाज करतो आहे. अनेक आले अन् गेले परंतु मी पक्षासोबत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात विकासाची गंगा वाहत आहे. आमदार ॲड राहुल ढिकले आणि माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्या मार्गदर्शनाने प्रभागात विकासकामे राबवली. प्रभागात जास्तीत जास्त निधी मंजूर करून विकासाला चालना दिली. त्यामुळे पक्ष नेतृत्व पुन्हा एकदा उमेदवारी देऊन प्रभाग १८ मध्ये काम करण्याची संधी देतील.असा आशावाद माजी नगरसेवक शरद मोरे ( सर ) यांनी व्यक्त केला.
प्रचाराचा पहिला टप्पा पूर्ण
जवळपास मागील आठ वर्षांपासून प्रभागातील जनतेच्या संपर्कात आहे. खरे तर महापालिकेची पंचवार्षिक निवडणूक जाहीर होण्याच्या अगोदरच मी प्रचाराला सुरुवात केलेली आहे. सद्या निवडणुकीची वातावरण निर्मिती होण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे प्रचाराचा जोर वाढत असला तरी माझा घरोघरी जाऊन प्रचाराचा पहिला टप्पा पूर्ण झालेला असल्याचे शरद मोरे ( सर ) यांनी म्हटले.




