220 Post Views
नाशिकरोड : उमेश देशमुख
सैन्यभरतीसाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने
उमेदवार देवळाली कॅम्प येथे दाखल झाले आहेत. या उमेदवारांच्या सोयीसाठी विविध सेवाभावी संस्था, संघटना सरसावल्या आहेत. यात भारतीय जनता पक्षातर्फे आनंद रोड येथे मोफत भोजन, पाणी आणि निवाऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या मदतीचा लाभ भरतीसाठी आलेल्या युवकांना होत आहे.

देवळाली कॅम्प शहरातील आनंद रोड मैदान येथे सुरू असलेल्या सैन्य भरतीसाठी भारतीय जनता पार्टी देवळाली कॅम्प शहरातील कॅन्टोन्मेंट बोर्डाचे नामनिर्देशित सदस्य सचिन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवकांसाठी मोठ्या प्रमाणात भोजन व्यवस्था, पिण्याचे पाणी, मोबाईल चार्जिंग सेंटर, प्राथमिक वैद्यकीय सुविधा व मार्गदर्शनाचे नियोजन करण्यात आलेले असून आलेल्या सर्व युवकांना याबाबत सहकार्य होत आहे. कडाक्याच्या थंडीच्या दिवसांमध्ये होत असलेल्या या सैन्य भरती मध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या युवकांना मायेची ऊब मिळत असल्याचे समाधान युवकांकडून व्यक्त होत आहे. युवकांच्या मदतीसाठी सतीश कांडेकर, जीवन गायकवाड, निलेश बंगाली,मंगेश शिंदोर्डे, सुरेश पाटील, संदीप ठाकरे, राजेश स्वामी, सुनील गुप्ता, राणा पारचा, निमेश प्रजापती, अभिजर औरंगाबादवाला प्रयत्नशील आहे.
प्रतिक्रिया
सैन्य भरतीसाठी येणाऱ्या युवकांची मोठी गैरसोय होत असते. त्यामुळे सामाजिक कर्तव्य म्हणून त्यांना मोफत भोजन अन् पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उपलब्ध करून देत आहे. काही प्रमाणात त्यांच्या निवाऱ्याची देखील व्यवस्था केली जाते आहे. ऐन कडाक्याच्या थंडीत आम्ही युवकांना मदतीच्या रूपाने मायेची उब निर्माण करून देण्याचा प्रयत्न करीत आहोत.
सचिन ठाकरे
नामनिर्देशित सदस्य, देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्ड
देवळालीत भाजपचे अतिथी देव भव !
देशातील सर्वात मोठे सैन्य प्रशिक्षण स्थळ देवळाली कॅम्प येथे आहे. देशभरातून युवक येथे सैन्यात भरतीसाठी येत असतात. त्यांची संख्या हजारोंच्या प्रमाणात असते. त्यांची भोजन निवाऱ्याची गैरसोय होत असते. ती दूर करण्यासाठी सेवाभावी संस्था सतत पुढे सरसावत असतात.भाजपाचे सचिन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिथी देव भव या वाक्य प्रचाराप्रमाणे तरुणांना मदतीचा हात देण्यासाठी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते सरसावलेले दिसतात.


