28.3 C
Nashik
Thursday, February 5, 2026
spot_img

तलवारी बाळगून दहशत निर्माण करणाऱ्या संशयितास अटक ; गुन्हेशाखा युनिट क-२ ची कामगीरी

485 Post Views
नाशिकरोड : उमेश देशमुख
अंबड सातपूर लिंक रोड येथे हातात तलवार बाळगून परिसरात दहशत पसरविणाऱ्या एका संशयित आरोपीस शुक्रवारी ( दि. ७ ) गुन्हेशाखा युनिट क-२ च्या पोलिस पथकाने ताब्यात घेऊन अटक केली. त्याच्याकडून जीवघेण्या दोन तलवारी हस्तगत करण्यात आल्या. यामुळे सामान्य जनतेने समाधान व्यक्त केले असून शहराचे पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांनी गुन्हे शाखेच्या युनिट क२ च्या पथकाचे अभिनंदन केले आहे.

दरम्यान पोलिस आयुक्त संदिप कर्णिक,पोलीस उप आयुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण, सहा. पोलीस आयुक्त, (गुन्हे) संदिप मिटके, नाशिक यांनी नाशिक शहरात प्राणघातक शस्त्रे बाळगणारे व दहशत माजविणारे गुन्हेहरकाचाबशोध घेवुन त्यांचेवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशा सूचना दिलेल्या आहे.त्याप्रमाणे ही कारवाई झाली. गुन्हेशाखा युनिट-२ कडील पोहवा मनोहर शिंदे, पोअंम महेश खांडबहाले यांना गोपनिय बातमी मिळाली की, अंबड-सातपुर लिकंरोड वरील वरचे चुंचाळे कडे जाणारे रोडवर एक इसम हातात धारदार तलवारी घेउन दहशत माजवत आहे अशी, बातमी मिळाल्याने सदरची बातमी सपोनि डॉ. समाधान हिरे, (प्रभारी अधिकरी) गुन्हेशाखा, युनिट २, नाशिक शहर यांना दिली त्यांनी योग्य ते मार्गदर्शन करून व सुचना देवुन श्रेणी. पोउपनिरी यंशवत बेडकोळी, पोहवा संजय सानप, मनोहर शिंदे, प्रकाश महाजन, वाल्मीक चव्हाण, पोअंम महेश खार्डबहाले, जितेंद्र वजिरे,अशांचे पथक तयार करून मिळालेल्या बातमीची खात्री करून पुढील कारवाई करण्याकामी रवाना केले.
पथकाने सापळा लावला असता अंबड-सातपुर लिकंरोड वरील वरचे चुंचाळे येथे एक इसम नामे फरीद शमसुधीन शहा, वय-२१ वर्ष, रा. गेट नं. ४ गजानन अपार्टमेंट रो. हौऊसेस, संजीव नगर सातपुर अंबड लिंकरोड, नाशिक हा त्याच्या हातातील २०००/-रू किंमतीच्या धारदार दोन तलवारी बाळगुन दहशत निर्माण करीत असतांना त्यास धारदार तलवारीसह ताब्यात घेवुन सदर आरोपींविरुध्द पोअंम/महेश खार्डबहाले यांनी दिलेल्या तक्रारी वरून अंबड पोलीस ठाणे येथे भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ व म.पो. का. कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपी यास पुढील कारवाई कामी जप्त मुददेमालासह अंबड पोलीस स्टेशच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles