23 C
Nashik
Thursday, February 5, 2026
spot_img

दिंडोरी तालुक्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला धक्का ! ; युवक जिल्हाध्यक्ष श्यामराव हिरे , तालुका अध्यक्ष राजेंद्र ढगे यांच्यासह समर्थकांचा सोमवारी भाजप मध्ये प्रवेश

426 Post Views

दिंडोरी : अशोक निकम

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिंडोरी तालुक्यात खिंडार पडणार असल्याचे चित्र आहे. नाशिकचे युवा जिल्हाध्यक्ष श्यामराव हिरे आणि दिंडोरी तालुका अध्यक्ष राजेंद्र ढगे यांचा सोमवारी ( दि. ३ ) सकाळी अकरा वाजता दिंडोरी येथील मेळाव्यात भारतीय जनता पक्षात प्रवेश होणार आहे.शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातली माजी आमदार रामदास चारोस्कर यांच्या प्रवेश भाजप सोहळ्या दरम्यान हा प्रवेश होईल. त्यामुळे दिंडोरी तालुक्यात भाजपचा विस्तार होण्यास निश्चित मदत होऊ शकते अशी चर्चा तालुक्यातील राजकीय पटलावर होतांना दिसत आहे.

महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील ठाकरेंच्या शिवसेनेनंतर आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील दोन पदाधिकाऱ्यांना भाजपाने गळाला लावले आहे. त्यांचा भाजपा पक्ष प्रवेश प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र ढगे तुतारीला सोडचिठ्ठी देऊन हाती कमळ घेणार आहे. युवक जिल्हाध्यक्ष श्यामराव हिरे यांचाही भाजपात प्रवेश होईल. त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे दोन पदाधिकारी पक्ष सोडत असल्याने राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला हा मोठा धक्का मानला जात आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे दिंडोरी तालुका अध्यक्ष यांनी पदाचा राजीनामा स्थानिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांना पाठविलेला आहे. यावेळी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात त्यांनी म्हटले की,माझ्या वैयक्तिक अडचणींमुळे पक्षास योग्य ती वेळ देवू शकत नाही. तसेच पक्षाध्यक्ष शरद पवार, खा सुप्रिया सुळे, आ. जयंत पाटील, आ. शशिकांत शिंदे, आ. रोहित पवार, आ. सुनिल भुसारा यांनी मला जे सहकार्य केले व संधी दिली. त्याबद्दल मी त्यांचाकायमस्वरुपी ऋणी ऋणी राहीन. आपल्यामार्गदर्शनाखाली जे काम केले त्याचा अनुभव मला भविष्यात सदैव कामास येईल. असा उल्लेख केलेला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles