23 C
Nashik
Thursday, February 5, 2026
spot_img

दिंडोरीत उध्दव ठाकरे यांना धक्का ! ; सोमवारी माजी आमदार रामदास चारोस्कर यांच्यासह कार्यकर्त्यांचा भाजप मध्ये प्रवेश

539 Post Views

दिंडोरी : अशोक निकम

दिंडोरी विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार रामदास चारोस्कर सोमवारी ( दि.३ ) आपल्या कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहे. प्रदेशाध्यक्ष रविंद चव्हाण मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा आणि कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडणार आहे. चारोस्कर यांच्या भाजप प्रवेशामुळे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला राजकीय धक्का बसू शकतो. असे बोलले जात आहे.

माजी आमदार चारोस्कर यांच्या सोबत माजी समाज कल्याण सभापती सुनिता चारोस्कर,बाजार समितीचे सभापती प्रशांत कड, उपसभापती योगेश बर्डे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सकाळी अकरा वाजता संस्कृती लॉन्स,दिंडोरी येथे प्रवेश सोहळा होईल.अशी माहिती भाजपा जिल्हा सरचिटणीस रणजित देशमुख,दिंडोरी तालुकाध्यक्ष श्यामराव मुरकुटे यांनी माध्यमांना दिली.याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, भाजपा जिल्हाध्यक्ष सुनिल बच्छाव आदींसह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

दरम्यान तालुक्यातील बाजार समितीचे संचालक,माजी नगराध्यक्ष ,नगरसेवक, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे चेअरमन, व्हा चेअरमन , पदाधिकाऱ्यांचा पक्ष प्रवेशात समावेश आहे. माजी आमदार रामदास चारोस्कर यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे दिंडोरी-पेठ विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाला नवी ऊर्जा व बळकटी मिळेल. असा विश्वास भाजपच्या पदाधिकाऱ्यांनीव्यक्त कीला आहे. सद्या प्रवेश सोहळ्याच्या आयोजनाची जय्यत तयारी सुरू असून तालुक्यातील राजकीय वर्तुळात याविषयी जोरदार चर्चा होताना दिसून येत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles