17.7 C
Nashik
Thursday, February 5, 2026
spot_img

अभियंता दिनानिमित्त महावितरणच्या प्रशिक्षणार्थी अभियंत्या तर्फे वृद्धाश्रमाला मदतीचा हात

202 Post Views

नाशिकरोड : उमेश देशमुख

महावितरणचे राज्यस्तरीय सुरक्षा व प्रशिक्षण केंद्र, एकलहरे येथे प्रशिक्षण घेत असलेल्या नवनियुक्त विद्युत अभियंत्यांनी अभियंता दिनाचे औचित्य साधून स्वयंप्रेरणेने सामाजिक उपक्रम राबवित नाशिक येथील वृद्धाश्रमातील ज्येष्ठांशी संवाद साधून त्यांना गरजेच्या वस्तूंची मदत करीत प्रशिक्षणात सामाजिक बांधिलकीचे धडे गिरविले आहेत.

महावितरणच्या प्रशिक्षण व सुरक्षा केंद्र एकलहरे येथे नवीन रुजू झालेल्या ४५ दिवसांचे प्रशिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थी अभियंत्यांच्या संकल्पनेतून १५ सप्टेंबर रोजी अभियंता दिन साजरा करण्यात आला. अभियंता दिनाच्या दिवशी समाजपयोगी कार्य करावे, अशी संकल्पना प्रशिक्षणार्थींनी यावेळी व्यक्त केली आणि त्यानुसार शहरातील लेखानगर येथील ‘दिलासा’ वृद्धाश्रमाला सर्वांनी भेट देऊन तेथील ज्येष्ठांशी सोबत संवाद साधून त्यांना गरजेच्या वस्तू, सुकामेवा, फळे इत्यादीचे वाटप करण्यात आले. सदर उपक्रम प्रशिक्षण व सुरक्षा केंद्राचे मुख्य महाव्यवस्थापक अरविंद भादिकर यांचे मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता आनंदराव देशमुख, उपकार्यकारी अभियंता चरणसिंग इंगळे व भूपेंद्र गांगुर्डे यांनी सहभाग नोंदविला. महावितरणच्या प्रशिक्षणार्थी अभियंत्यांनी पुढाकार घेऊन राबलेल्या या सामाजिक उपक्रमाचे महावितरणच्या सर्वांनी कौतुक केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles